आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi Is The Sixth Among The Most Preferred Men In The World, Michelle Obama First In Women

मोदी जगात पसंतीच्या पुरुषांत सहावे, महिलांत मिशेल ओबामा पहिल्या क्रमांकावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात सर्वात पसंतीचे भारतीय पुरुष ठरले आहेत. ब्रिटनची इंटरनेट मार्केट रिसर्च व डेटा अॅनालिटिक्स फर्म युगॉवने यंदा जगातील अव्वल २० आकर्षक पुरुष व महिलांची यादी गुरुवारी जाहीर केली. बिल गेट्स यंदाही या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. महिलांमध्ये मिशेल आेबामा यांनी अँजेलिना जोलीस पिछाडीवर टाकून पहिली पसंती मिळवली. 


मिशेल या माजी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्या पत्नी होत. या पाहणीसाठी ४१ देशांतील ४२ हजारांहून जास्त लोकांची ऑनलाइन मुलाखत घेऊन माहिती संकलित करण्यात आली. त्या आधारे दोन श्रेणींत ही यादी जाहीर करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या श्रेणीत २ अंकांनी वर आले आहेत. गेल्या वर्षी ते ८ व्या क्रमांकावर होते. अमिताभ यांची ३ क्रमांकांनी घसरण झाली. ते १२ व्या क्रमांकावर गेले. शाहरुख व सलमानने यंदाच यादीत प्रवेश केला. ते अनुक्रमे १६ व्या आणि १८ व्या क्रमांकावर आहेत. 
 

 

२० पसंतीच्या पुरुषांतील आघाडीचे ५

नाव    कौल %    श्रेणी
बिल गेट्स  :  9.6    1
बराक ओबामा :    9.2    2
जॅकी चॅन  :  5.7    3
शी जिनपिंग :   5.1    4
जॅक मा  :  4.9    5

> बिल गेट्स यांच्यानंतर आेबामा ही लोकांची पसंती आहे. प्रसिद्ध कलाकार जॅकी चॅन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चीनचे राष्ट्रपची जिनपिंग चौथ्या स्थानी, अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे पाचव्या क्रमांकावर आहेत.

 

२० पसंतीच्या महिलांमध्ये आघाडीच्या ५

नाव    कौल %    श्रेणी

मिशेल ओबामा  :      8.8        1
ओप्रा विन्फ्रे    :  6.9    2
अँजेलिना जोली :    6.8    3
क्वीन एलिझाबेथ- 2  :   5.9    4
एम्मा वॉटसन   :   4    5

 

> आघाडीच्या २० महिलांमध्ये दीपिका पदुकोनची रँकिंग बदलली नाही. गेल्या वर्षी ती १३ व्या क्रमांकावर होती. प्रियंका चोप्राची घसरण होऊन ती १५ व्या क्रमांकावर आली आहे. सुष्मिता सेनने यंदा प्रवेश केला.