आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग शुक्रवारी भारताच्या दोनदिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांत अनौपचारिक चर्चा होईल. या चर्चेदरम्यान दहशतवादाच्या मुद्द्यावर चिनी नेत्याच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. जिनपिंग यांच्या स्वागतासाठी तामिळनाडूतील मामल्लापुरममध्ये (महाबलीपुरम) जय्यत तयारी आहे. पल्लवकालीन प्राचीन बंदर म्हणून ओळख असलेल्या या शहराशी चीनचे ऐतिहासिक नाते आहे. पल्लव वंशाच्या शासनकर्त्यांनी त्या काळात चीनमध्ये दूत पाठवला होता. तेव्हा चीन-भारत संबंध अत्यंत सौहार्दाचे होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनइंग यांनी बुधवारी या दौऱ्याची घोषणा केली.
... इकडे इम्रान खानना चीनकडून मैत्रीची हमी
भारत दौऱ्यापूर्वी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांतील संबंध अतूट आणि पक्के असल्याची हमी जिनपिंग यांनी बुधवारी दिली. तर, इम्रान यांनी चीनने केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल आभार मानले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.