आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी एपीआयएक्स बँकिंग तंत्रज्ञान केले लाँच; 2 अब्ज लोक जोडणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर बुधवारी सिंगापूरला पोहोचले. तेथे त्यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली. मोदींनी तिसऱ्या सिंगापूर फेस्टिव्हलला संबोधित केले. याआधी कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला असा मान मिळाला नव्हता. पंतप्रधानांनी तेथे अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस एक्स्चेंजही (एपीआयएक्स) लाँच केले. एपीआयएक्स बँकिंग टेक्नाॅलॉजी प्लॅटफॉर्म आहे. ते भारत, श्रीलंका आणि ब्रिटनच्या सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी तयार केले आहे. पण ते अमेरिकेत वर्तुसाच्या बोस्टन मुख्यालयात विकसित केले आहे. त्याद्वारे १० आशियान देशांसह जगातील २३ देशांचे ग्रामीण राहणारे २ अब्ज लोक जोडले जातील. त्यांच्याकडे सध्या बँक खाते नाही.  


त्याआधी फिनटेक फेस्टिव्हलमध्ये जगभरातून आलेल्या ३० हजार तज्ज्ञांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, भारत आज फिनटेक कंपन्या आणि आर्थिक संस्थांसाठी मोठ्या संधींचे द्वार ठरला आहे. त्याची सुरुवात आशियान आणि भारतीय बँका आणि फिनटेक कंपन्यांमधील समन्वयाने होईल. भारत आणि सिंगापूर एका भारतीय प्लॅटफॉर्मद्वारे आशियान देशांच्या लघु आणि मध्यम उद्योगांना परस्परांशी जोडण्याच्या दिशेनेही काम करत आहेत. आगामी काळात त्याचा विस्तार जगभर केला जाईल. जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती बदलत आहे, तंत्रज्ञान नव्या जगाची शक्ती परिभाषित करत आहे. 

 

निमंत्रण : फिनटेक, स्टार्टअप कंपन्यांसाठी भारत उत्तम गंतव्य स्थळ  

मोदी म्हणाले, जेथे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऐतिहासिक बदल केला जात आहे अशा युगात आपण आहोत. डेस्कटॉपपासून क्लाउड सर्व्हिसपर्यंत, आयटी सेवांपासून इंटरनेटपर्यंत आपण कमी काळात मोठा पल्ला गाठला. भारत तुमच्यासाठी सर्वोत्तम गंतव्य स्थळ आहे हे मी प्रत्येक फिनटेक आणि प्रत्येक स्टार्टअपला सांंगू इच्छितो. भारतात फिनटेक इनोव्हेशन आणि एंटरप्राइजचा खूप बोलबाला आहे. त्यामुळे भारत जगातील अव्वल स्टार्टअप देशांपैकी एक आहे. फिनटेक आणि उद्योग ४.० (चौथ्या पिढीचे उद्योग) यांचे भविष्य भारतात उत्तम आहे.  

 

यश : २८ बँका यूपीआयशी जोडल्या, २४ महिन्यांत ट्रान्झॅक्शन १५०० पट वाढले  

मोदी म्हणाले, फिनटेक फेस्टिव्हल विश्वासाचा उत्सव आहे. सिंगापूर आता आर्थिक सेवांचे हब आहे, गेल्या वर्षी जूनमध्ये मी येथून रूपे कार्ड लाँच केले होते. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) आधारित भारत इंटरफेस फॉर मनीचीही (भीम) सुरुवात केली होती. त्याने वेग घेतला आहे. भारतात रूपे आणि भीम अॅपच्या मार्फत डिजिटल ट्रान्झॅक्शन वाढले आहे. देशातील १२८ बँका यूपीआयशी जोडलेल्या आहेत. गेल्या २४ महिन्यांत यूपीआयद्वारे ट्रान्झॅक्शनमध्ये १५०० पट वाढ झाली आहे. डिजिटल ट्रान्झॅक्शन दरमहा ३०% वाढत आहे.  

 

द्विपक्षीय चर्चा : अमेरिकेचे उपाध्यक्ष पेन्स-सिंगापूरच्या पंतप्रधानांना भेटले मोदी  

मोदींनी अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोघांत आर्थिक, लष्करी, दहशतवाद या मुद्द्यांवर चर्चा झाली. मोदींनी मेक इन इंडियाचा उल्लेख करत म्हटले की, अमेरिकेकडे भारतात संरक्षण उत्पादनाची चांगली संधी आहे. त्यांनी पेन्स यांना भारतात येण्याचे निमंत्रण देताना म्हटले की, तुमच्याकडे चांगला अनुभव आहे, त्याचा फायदा भारताला मिळावा. पेन्स यांनी विभागीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधांत मजबुतीसाठी भारताची स्तुती केली. ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनी येण्यास नकार दिल्यानंतर ही भेट झाली. मोदींनी सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लोंग यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. तीत दोघांनी व्यूहात्मक भागीदारी, कनेक्टिव्हिटी, आर्थिक तंत्रज्ञान, दूरसंचार, विभागीय आर्थिक एकीकरणावर चर्चा केली.  

बातम्या आणखी आहेत...