आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींना पाकिस्तानचा कांदा आणि साखर चालते पण त्यांना मंदीवर बोलावेसे वाटत नाहीत - जितेंद्र आव्हाड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मोदींनी कांदा, साखर पाकिस्तानातून आणलेली चालते. नवाज शरीफच्या घरी न बोलवता बिर्याणी खाल्लेली चालते मग ते मंदीवर का बोलत नाहीत असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. पुण्यातील श्रमिक पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान मोदी मंदीचा परिणाम झाकण्यासाठी धार्मिक द्वेषावर भाषण करत आहेत. त्यांना कोल्हापूर-सांगलीत आलेल्या संकटावर बोलवेसे वाटले नाही असा घणाघणात आव्हाड यांनी यावेळी केला. 

मी पवारांचा वारकरी, त्यांची विठ्ठलाप्रमाणे पूजा करतो
पुढे बोलताना ते म्हणाले की,  मी शरद पवारांचा वारकरी आहे. त्यांची विठ्ठलाप्रमाणे सेवा करतो. गेल्या 35 वर्षांत राज्यातील राजकारणात काही बदल झाला नाही. 90 साली बाळासाहेब ठाकरे आणि गोपिनाथ मुंडे यांनी पवारांवर टीका केली होती. आजही मोदी-शहा तेच करत आहेत. पण शरद पवार मात्र आहे तिथेच आहेत. शरद पवार आजही महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत.

...नाहीतर शिवसेना फुटेल
शिवसेना-भाजप युतीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, शिवसेनेला 100 जागा दिल्या तरी घेतील, नाहीतर पक्ष फुटेल. कोण कुठेही जाणार नाही त्यांचे पक्क झालं आहे.