आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi Meets CEO Of 17 Energy Companies; Contract To Provide 50 Million Tonnes Of LNG Per Year To India

मोदींनी ऊर्जा कंपन्यांच्या 17 सीईओंची भेट घेतली ; भारताला दरवर्षी 50 लाख टन एलएनजी देण्याचा करार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्यूस्टन - संयुक्त राष्ट्र महासभेत सहभाग घेण्यासाठी गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्री उशिरा ह्यूस्टन येथे पोहोचले. यावेळी व्यापार आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे संचालक क्रिस्टोफर ओल्सन आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. यानंतर मोदींची अमेरिकेचे ऊर्जा शहर मानले जाणाऱ्या ह्यूस्टनमध्ये ऊर्जा कंपन्यांच्या 14 सीईओंसोबत बैठक पार पडली. उर्जा क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यात सहयोग वाढवण्याच्या उद्देशाने ही बैठक पार पडली. 

या वेळी इंडियन पेट्रोलियम कंपनी पेट्रोनेटने अमेरिकेच्या नैसर्गिक गॅस (एलएनजी) कंपनी टेलूरियनकडून वर्षाकाठी 5 दशलक्ष टन एलएनजी आयात करण्याचा करार केला. एमओयूनुसार, पेट्रोनेट ड्रिफ्टवुड होल्डिंगमध्ये गुंतवणूक करणार आहे. यामुळे पेट्रोनेट प्रकल्पातील पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातून दरवर्षी 50 दशलक्ष टन एलएनजी खरेदी करण्याचा अधिकार पेट्रोनेटला मिळणार आहे.  दरम्यान टेल्युरियन आणि पेट्रोनेट यांच्या कराराची देवाणघेवाण 31 मार्च 2020 पर्यंत पूर्ण करणार आहेत.