आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दौरा : सरकार पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी खर्च करणार; पंतप्रधांनी दिली माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आदींनी मोदींचे स्वागत केले. यानंतर त्यांनी येथील लोकमान्य सेवा संघातील गणेशाचे दर्शन घेतले. मोदी मुंबईतील मेट्रो भवनाची पायभरणी करण्यात आली. यावेळी त्यांनी मेट्रोच्या कामांचा आढावा घेतला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10, 11, 12 मेट्रो मार्गाचे उद्घाटन पार पडले.  यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकले, विनोद तावडे यांची उपस्थिती आहे. 
 

आम्हाला सत्तेची हाव नाही पण विकास करण्यासाठी सत्ता हवी आहे - उद्धव ठाकरे
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले की, मोदी देशाच्या अभिमानाचे आणि अस्मितेचे विषय हाताळत आहेत. देशाला दिशा दाखवणारे नेतृत्व मोदींच्या रुपात मिळाले. मोदींचे किती गोष्टींसाठी अभिनंदन करावे हे समजत नाही. गेले अनेक वर्षे आपण ज्या गोष्टी बोलत होतो त्या पूर्ण केल्या आहेत. काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्याबद्दल मला मोदींचा अभिमान आहे. उराशी बाळगलेले स्वप्न त्यांनी शब्दात नाही तर प्रत्यक्षात पूर्ण केले आहे. 
 
 
येणाऱ्या निवडणुकीत युतीचेचं सरकार येणार असल्याचा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. आम्हाला सत्तेची हाव नाही तर राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवी असल्याचे ते म्हणाले. देशात इलेक्ट्रीक बस आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 

मोदींनी उद्धव ठाकरेंचा लहान भाऊ असा केला उल्लेख 
पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने आपल्या भाषणाला सुरुवात केली. तसेच सर्व मुंबईकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्या दिल्या. भाषणा दरम्यान मोदींनी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असे कौतुक केले. तर उद्धव ठाकरेंचा आपला लहान भाऊ म्हणूऩ उल्लेख केला. 

चांद्रयान 2 विषयी बोलताना ते म्हणाल की, इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी दाखवलेल्या हिमतीमुळे मी प्रभावित झालो. कठीण परिस्थिती आणि मोठ्या आव्हानानंतर आपल्या ध्येयाला कसे प्राप्त करावे हे आपल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून शिकायला मिळते. इस्त्रो ध्येयपूर्ती केल्याशिवाय शांत बसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
 

मुंबईच्या गतीवर देशाची प्रगती अवलंबून - मोदी
मोदी पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईच्या गतीवर देशाची प्रगती अवलंबून आहे. गेल्या पाच वर्षात मुंबईच्या इंन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने बरेच परिश्रम घेतले आहेत. भविष्य लक्षात ठेवून आतापासून काम करत आहोत. प्रत्येक क्षेत्रात एक उत्तम व्यवस्था आम्हाला तयार करायची आहे. दळवणासाठी रेल्वे, मेट्रो, रस्ते आधुनिक करणार आहोत. यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी खर्च करणार आहे. याचा लाभ मुंबईसोबत महाराष्ट्रातील शहरांना होणार असल्याचे ते म्हणाले. 
 

देशाने दिलेल्या महाजनादेशामुळे अनेक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कार्य पूर्ण - मोदी
एक भारत श्रेष्ठ भारत तत्वावर काम सुरु आहे. आमचे सरकार संपूर्ण देशात आधुनिक इंन्फ्रास्ट्रक्चरवर काम करत आहे. देशभरात 2023 पर्यंत 325 किमीचे मेट्रोचे जाळे असणार आहे. यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.  देशाने दिलेल्या महाजनादेशामुळे अनेक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कार्य पूर्ण झाले आहे. 
 

एक भारतीय एक संकल्प करण्याचे मोदींचे आवाहन 
यावेळी एक भारतीय एक संकल्प करण्याचे आवाहन मोदींने केले. संकल्प पूर्ण करत असताना मागे हटू नका असेही ते यावेळी म्हणाले. 
 

प्लास्टिकमुक्त गणेश विसर्जन साजरे करण्याचे आवाहन 
प्लास्टिकमुक्त गणेश विसर्जन साजरा करण्याचे आवाहन मोदींनी यावेळी केले. विसर्जना करताना कोणतेही प्लास्टिक समुद्रात किंवा मिठी नदीत सोडणार नाही असा संकल्प करण्याचे आवाहान मोदींनी केले. तसेच विसर्जनानंतर समुद्र आणि मिठी नदीतील प्लास्टिक बाहेर काढण्यासाठी काम करावे ते म्हणाले.  
 

बातम्या आणखी आहेत...