आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi Regime Planning Another Strike In April During Elections, Claims Mamata Banerjee

निवडणुकीच्या काळात राजकीय फायद्यासाठी आणखी एका हल्ल्याच्या तयारीत सरकार; ममता बॅनर्जींचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - लोकसभा 2019 च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्ष आप-आपल्या पद्धतीने प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. याच दरम्यान तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया मुद्दाम लांब ठेवण्यात आली. यात सरकारचे स्वार्थ आहे. याच दरम्यान भाजपच्या नेतृत्वातील केंद्र आणखी एका हल्ल्याच्या तयारीत आहे. हा हल्ला कशा स्वरुपाचा असेल हे मी सांगू शकत नाही. परंतु, राजकीय फायदा मिळवणे आणि पश्चिम बंगालला त्रास देणे हा त्यांचा हेतू आहे असा दावा ममतांनी केला. तृणमूल काँग्रेस अध्यक्षांचा हा दावा आणखी एका सर्जिकल स्ट्राइकशी जोडला जात आहे.


पत्रकार परिषदेत दिली माहिती
ममता बॅनर्जी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या, "काही वरिष्ठ पत्रकारांनी मला सांगितले आहे, की आणखी एक हल्ला होणार आहे. मी सांगू शकत नाही की हा हल्ला कशा स्वरुपाचा राहील. एप्रिलमध्ये अमक्या ढमक्याच्या नावाने हा हल्ला केला जाईल. त्यामुळेच, मतदानाची प्रक्रिया 19 मे पर्यंत सुरूच ठेवली जात आहे. कृपया मला चुकीच्या पद्धतीने दाखवू नका. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेविषयी माझ्या मनात खूप आदर आहे. परंतु, पश्चिम बंगालमध्ये वातावरण खराब करणे हा भाजपच्या कटाचा एक भाग आहे."


भाजपने आरोप फेटाळले
तर दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ममतांच्या आरोपांनंतर एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ममतांचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. "विनाकारण आरोप लावत राहणे ही ममतांची सवय आहे. त्या हवेतच बोलत असतात. जर तुमच्याकडे खरंच पुरावे असतील तर ते सार्वजनिक करायला हवे."

बातम्या आणखी आहेत...