आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मॉब लिंचिंग हा गुन्हा आहे, मग भलेही त्यांचा उद्देश काहीही असो!' - पंतप्रधान नरेंद्र मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल यांच्या गळाभेटीवर म्हणाले- मी विनम्र कामदार, नामदारांशी तुलना नाही

 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले की, देशात मागच्या वर्षभरात 1 कोटींहून जास्त रोजगार निर्माण झाला आहे. लोक बेरोजगार असल्याचा विरोधकांचा दुष्प्रचार आता बंद झाला पाहिजे. वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले. यादरम्यान त्यांनी कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासहित विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या आरोपांना उत्तरे दिली. एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, लिंचिंग हा गुन्हा आहे, मग भलेही त्याचा उद्देश काहीही असो.

 

प्रश्न: एनआरसीच्या मुद्द्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जींनी देशात गृहयुद्ध आणि रक्तपाताचे वक्तव्य केले आहे?
मोदी: ज्यांचा स्वत:वरील विश्वास उडालेला आहे, ज्यांना जनसमर्थन गमावल्याची भीती आहे आणि ज्यांचा आपल्या व्यवस्थेवर विश्वास नाही, तेच लोकं गृहयुद्ध, रक्तपात आणि देशाचे तुकडे-तुकडे यासारखे शब्द वापरू शकतात. असे लोक नि:संशय देशापासून तुटलेले आहेत. मी आश्वस्थ करतो की, भारताच्या कोणत्याही नागरिकाला देश सोडावा लागणार नाही. एनआरसीमध्ये निश्चित प्रक्रियेनुसार सर्वांना मुबलक संधी दिली जाईल.

 

या मुलाखतीत पंतप्रधानांनी रोजगार, एनडीएमधील सहकारी पक्षांची भूमिका, जम्मू-काश्मीरमधील सत्ता सोडण्याचे कारण, तसेच आरक्षण, राहुल गांधींची गळाभेट यासह इतर अनेक मुद्द्यांना रोखठोक उत्तरे दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...