आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस हटवा, गरिबी आपोआप हटेल : मोदी, गरिबांचा अवमान, मोदी माफी मागा : काँग्रेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरत, रुद्रपूर, अखनूर -   लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर १८ व्या दिवशी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा तासांत तीन राज्यांत सभा घेत भाजपच्या प्रचाराची सुरुवात केली. उत्तर प्रदेशातील मीरत, उत्तराखंडातील रुद्रपूर आणि जम्मू- काश्मीरमधील अखनूर येथील प्रचार सभांत त्यांनी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांवर टीका केली. 


काँग्रेसच्या किमान उत्पन्न हमी योजनेवर (न्याय) टीका साधत मोदींनी काँग्रेसवर गरिबांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, जो पक्ष ७० वर्षांत गरिबांसाठी बँक खाते उघडू शकला नाही तो त्यांच्या खात्यात पैसे काय टाकणार? माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ‘गरिबी हटाव’ घोषणेवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, मी लहानपणापासून गरिबी हटाव ही घोषणा ऐकतो आहे. अनेक पिढ्या गेल्या. त्यांची भरभराट झाली, गरीब मात्र गरीबच राहिले. काँग्रेसने गरिबांचा विश्वासघात केला. काँग्रेस हेच गरिबीचे कारण आहे. आता गरिबांनी ठरवले आहे की, काँग्रेस हटवा, गरिबी आपोआप दूर होईल. ते म्हणाले, चौकीदाराच्या सरकारने जमीन, आकाश आणि अंतराळात सर्जिकल स्ट्राइक करण्याचे धाडस दाखवले आहे. मोदी यांनी २०१४ मध्येही मीरत येथूनच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली होती.


सप-रालोद-बसपची आघाडी ठरवली “सराब’ :  उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल व बहुजन समाज पक्षातील आघाडी “सराब’ असून शराब आरोग्यास हानिकारक ठरते, असा संदर्भ मोदींनी राज्यातील राजकीय आघाडीवरून जोडला. 

 

गरिबांची टर उडवणाऱ्या मोदींनी माफी मागावी : काँग्रेस   
^नोटबंदी करून गरिबांना घायाळ करणाऱ्या मोदी यांनी गरिबांच्या हितासाठीच्या न्याय योजनेची टाळ्या वाजवत टर उडवली आहे. या योजनेला विरोध करत ते गरिबांच्या पोटावर लाथ मारत आहेत. देशातील २५ कोटी गरिबांची टर उडवणाऱ्या पंतप्रधानांनी माफी मागावी. - रणदीप सुरजेवाला   

 

वेष पसरवणाऱ्यांना सराब, शराब यातील फरक माहीत नाही : सपा   
^द्वेषाची नशा पसरवणाऱ्यांना सराब व शराब यातील फरक माहीत नाही. सराबचा अर्थ मृगजळ असाही होतो. हे एक धूसर स्वप्न आहे, जे भाजप गेल्या ५ वर्षांपासून दाखवते आहे, मात्र ते प्रत्यक्षात आलेले नाही. आता नवे मृगजळ दाखवत आहेत.  अखिलेश यादव, सपा

बातम्या आणखी आहेत...