आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी-शहांनी नथुराम गाेडसेचा राष्ट्रवाद आम्हाला शिकवू नये, पुण्यातील 'सीएए'विराेधी माेर्चात उमर खालिद यांची भाजप नेत्यांवर टीका

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे : 'नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) हा देशातील लोकशाहीवर हल्ला आहे. मुस्लिम व हिंदू एकत्रितरीत्या हा हल्ला थाेपवत नाहीत ताेपर्यंत हे हल्ले सुरूच राहतील. मात्र, ३०३ खासदारांच्या बळावर संविधानात बदल करण्याचा डाव मोदी-शहांनी आखला आहे. देशातील जनता या अहंकारी मंडळींची चरबी उतरवल्याशिवाय राहणार नाही. स्वातंत्र्यसंग्रामात मुस्लिमांचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे माेदी- शहांनी आम्हाला नथुराम गोडसेचा राष्ट्रवाद शिकवण्याचा प्रयत्न करू नये,' अशी टीका 'जेएनयू'तील विद्यार्थी नेता उमर खालिद यांनी रविवारी भाजपवर केली.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विराेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या माेर्चेेकऱ्यांसमाेर ते बाेलत हाेते. गोळीबार मैदानातून सुरू झालेल्या या माेर्चाचे विधानभवन चाैकात सभेत रूपांत झाले. लोकांनी या माेहिमेत कोणतीही कागदपत्रे न दाखवून कायद्यावरच बहिष्कार टाकावा, असे आवाहन उपस्थितांनी केले. दलित व मुस्लिम समाजातील अनेक संघटना माेर्चात सहभागी हाेत्या. माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील म्हणाले, 'मोदी-शहा या तडीपारांना देशातील जनतेने नव्हे, तर ईव्हीएमने निवडून दिले आहे. ज्या दिवशी दलित, आदिवासी मुस्लिमांपैकी एक जण देशाचा पंतप्रधान होईल तेव्हाच देशात खरी लोकशाही अवतरली असे म्हणता येईल. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे देशातील १५ काेटींहून अधिक लाेकांना डिटेन्शन सेंटरमध्ये टाकून उर्वरित १० ते १५ काेटी लोकांमधूनच मोदी-शहांना पुन्हा सरकार आणायचे आहे, असा अाराेपही त्यांनी केला.