आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींनी पुन्हा एकदा चकवले, शिवसेना ठरली शिशुपाल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवनीत गुर्जर


तीन डोळे आणि चार हात असलेल्या राजकुमार शिशुपालचा मृत्यू किंवा त्याचे नुकसान फक्त कृष्णाच्या हातून होईल हे निश्चित झाले तेव्हा शिशुपालाची आई कृष्णाकडे गेली. आणि कृष्णाला म्हणाली, माझ्या मुलाला माफ कर. कृष्णाने उत्तर दिले की, मी विधिलिखित तर बदलू शकत नाही, मात्र वचन देतो की, शिशुपालाच्या शंभर चुका माफ करेन, शेवटी १०१ वी चूक झाल्यानंतर कृष्णाने शिशुपालाच्या विरुद्ध शस्त्र उचलले. सेनेबाबत भाजपनेही हेच केले आहे.


खरे तर राजकारण असो की सामान्य जीवन, जेव्हा आपण स्वत: मर्यादा ओलांडतो तेव्हा दुसऱ्यांकडून नैतिकतेची अपेक्षा करता येत नाही. भाजपच्या १०५ च्या तुलनेत सुमारे निम्म्या म्हणजे ५६ जागा जिंकलेल्या शिवसेनेने स्वत:साठी मुख्यमंत्रिपदाची अवघड इच्छा ठेवली. हे निवडणूकपूर्व युतीच्या मर्यादेचे उल्लंघन होते. नंतर सत्ता मिळवण्यासाठी ज्यांच्याविरोधात निवडणूक लढली त्यांच्यासोबतच आघाडीच्या हालचाली सुरू केल्या. हेच हरियाणातही घडले, मात्र तेथील परिस्थिती वेगळी होती आणि महाराष्ट्रात अगदीच भिन्न. शरद पवार राजकारणात मुरलेले आहेत, अनेक वर्षांपासून मित्र असलेली शिवसेना भाजपची होऊ शकली नाही, तर ती राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची कशी काय होऊ शकते ? हे ते पुरेपूर ओळखून आहेत. नेमकी याच बाबीचा विचार न करण्याची चूक शिवसेनेने केली. सत्तेची लालसा अशी असते.

ज्या दिवशी राष्ट्रपती राजवट लागू झाली, त्याच दिवशी सत्तेची बाजी भाजपच्या हातात होती. उद्धव ठाकरे यांच्या लक्षात ही बाब का आली नाही किंवा त्यांना ते कोणी लक्षात येऊ दिले नाही हे कोणालाच माहिती नाही.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीपुरते सांगायचे झाले तर सरकारचे पारडे त्याच दिवशी सरकले होते. तसे तर राजकारणात नैतिकता आता फक्त बोलण्यापुरतीच मर्यादित आहे. बोलण्यात चांगली वाटते, करण्यात नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत की, ऐनवेळी सत्तेची बाजी उलटली आहे. भजनलाल आणि चौधरी चरणसिंग यांचे काय झाले सर्वांना माहिती आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात जे काही झाले त्यात नवे काही नाही. पूर्वीपासूनच मोदींचे राजकारण चकवणारे राहिले आहे. महाराष्ट्रातही ते त्यांनी सुरू ठेवले. गुजरातीत एक म्हण आहे - देखाड्यो देवो अने परणाव्यो पबो. म्हणजे दाखवायचा एक नवरा आणि फेरे दुसऱ्या कोणाबरोबर तरी घ्यायचे. महाराष्ट्राने असेच चकित केले.

अजित पवार यांनी आपल्याला धोका दिल्याचे शरद पवार यांचे म्हणणे खरे असेल तर मात्र भाजप तोंडावर आपटू शकते. फ्लोअर टेस्टमध्ये गणित बिघडू शकते. घोडेबाजारासाठी अजित पवार यांना शपथ देण्यात आल्याची शक्यता आहे. मात्र इतके आमदार शरद पवार यांना सोडून जातील असे वाटत नाही.

नवनीत गुर्जर, नॅशनल एडिटर
 

बातम्या आणखी आहेत...