आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरीकेत गेलेले भारतीय बनले मोदींची ताकद, घरोघरी फोनकरून मागत आहेत मतं...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अमेरिकेतील एक उपनगर क्लार्क्सबर्गमध्ये राहणारे आयटी कंसल्टंट मधु बेल्लाम रविवारी सकाळी अंदाजे 1500 भारतीय वोटर्सची कांटॅक्ट डिटेल घेऊन बसले आहेत. ते एक कांटॅक्ट नंबरला आपल्या फोनमध्ये फीड करत आहेत आणि आपल्या होम टाउन हैदराबादमधील लोकांना फोन करून त्यांना मोदीला 2019 च्या निवडणुकीत व्होट देण्याची अपील करत आहेत. बेल्लम अंदाजे दोन दशकांपूर्वी अमेरीकेत गेले होते. त्यानंतर 2011 मध्ये भारतीय पासपोर्ट सरेंडर करून ते अमेरिकेचे नागरिक बनले. आता ते आपली टेक कंसल्टंसी चालवतात. 

 
भारताचच्या आर्थिक विकासासाठी महत्तावाचे आहे मोदी सरकार 
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार बेल्लम या गोष्टींवर ठाम आहेत की, भारतीय जनता पार्टी भारताच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची आहे. ते 2019 च्या निवडणुकीत मोदी सरकारला दुसरी संधी देण्याची मागणी करत आहेत. बेल्लम फोनवर भारतामध्ये लोकांना फोन करून मोदीला मंत देण्याची विनंती करत आहेत. बेल्लमला भारतीय मतदारांचे फोन नंबर भारतीय जनता पार्टीने दिले आहेत. 
 

बेल्लम आणि त्यांचे भाजपा समर्थक भारतात आपल्या नेटवर्कने मोदीसाठी समर्थन मागत आहेत. ते आपले नातेवाईक, मित्र आणि इतर लोकांना फोन करून मोदीला समर्थन देण्यास सांगत आहेत.


भाजपसाठी अमेरीकेतून चालत आहे प्रचार 
यूएस चॅप्टर ऑफ द ओवरसीज फ्रेंड्स ऑफ द बीजेपीचे अंदाजे 4,000 सदस्य आहेत. पण याचे प्रेसीडेंट कृष्णा रेड्‌डीचे अनुमान आहे की, त्यांच्या नेटवर्कमध्ये अंदाजे 3 लाख भाजपा समर्थक आहेत. यापैकी अनेक लोक मंत देण्यासाठी भारतात जाऊ शकत नाहीत त्यामुळे ते फोनच्या माध्यमातून प्रचार करत आहेत.

 

20 देशात आहेत मोदी समर्थक 
बीजेपीचे फॉरेन अफेयर्स सेलचे हेड विजय चौथाईवालेने सांगितले की, जगभरातील 20 देशात मोदी समर्थक आहेत जे फोनच्या माध्यमातुन भाजपाचा प्रचार करत आहेत. अमेरीकेशिवाय ब्रिटेन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अफ्रीकामध्ये मोठ्या संख्येने मोदी समर्थक आहेत. पण ऑस्ट्रेलियांत सगळ्यात जास्त 40 लाख भारतीय आहेत. 

बातम्या आणखी आहेत...