आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच शिवसेनेने भाजपबद्दलचे आपले मत बदलले आहे. आज(शुक्रवार) शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये 'बघता काय? सामील व्हा! सुराज्याचा उत्सव!!' अशा मथळ्याने एक लेख लिहीण्यात आला. या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचा मोठा भाऊ सांगण्यात आलं आहे. यासोबतच संघर्ष आणु युद्ध आयुष्याचा भाग असतो, असेही लिहीण्यात आले आहे.
'लहान भावाला साथ देण्याची जबाबदारी मोदींची'
सामनात लिहीले, "महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा-शिवसेनेत दुरावा आलाय, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि उद्धव ठाकरेंचे नाते भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाची जबाबदारी मोदींना घ्यावी लागेल. पंतप्रधान एखाद्या पक्षाचा नाही तर संपूर्ण देशाचा असतो. संघर्ष आणि युद्ध आयुष्याच्या भाग आहे."
सामनातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला. "मागील सरकार पाच वर्षे होती आणि पाच लाख कोटींचे कर्ज आमच्या डोक्यावर ठेऊन गेली. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सकरार सत्य आणि न्यायाच्या अग्निपरीक्षेत पास होईल. येत्या काळात अनेक विकास कामे केली जातील."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.