• Home
  • National
  • Delhi
  • Modi told Bear Grylls, I was Chief Minister for 13 years, Prime Minister for 5 years, this was my first vacation after 18 years

Man vs Widl / मोदी बेअर ग्रिल्सला म्हणाले, १३ वर्षे मुख्यमंत्री होतो, ५ वर्षे पंतप्रधान, १८ वर्षांनंतर ही माझी पहिली सुट्टी

टि्वटरवर हॅशटॅग मॅन व्हर्सेस वाइल्ड शो ट्रेंडमध्ये जगात दुसऱ्या तर भारतात टॉपवर

दिव्य मराठी नेटवर्क

Aug 13,2019 10:25:00 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी रात्री “मॅन व्हर्सेस वाइल्ड” या प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमात दिसले. कार्यक्रमाचे होस्ट बेअर ग्रिल्स यांना त्यांनी जीवनातील अनेक महत्त्वाचे प्रसंग सांगितले. या वेळी टि्वटरवर हॅशटॅग मॅन व्हर्सेस वाइल्ड जगभरात दुसऱ्या तर भारतात टॉपवर ट्रेंड सुरू होता. ग्रिल्स यांनी मोदींच्या त्यांच्या आयुष्यातील घटनांची माहिती विचारली. तेव्हा ते म्हणाले, सुमारे १३ वर्षे एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यानंतर जनतेने पंतप्रधान केले. सुट्यांबाबत विचाराल तर सांगतो गेल्या १८ वर्षांतील ही माझी पहिली सुटी आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, िनसर्गाची भीती बाळगू नये. माझ्या लहानपणी घरी गरिबी होती. परंतु वडील पोस्टकार्ड घेऊन येत आणि नातेवाइकांना पावसाची माहिती कळवत असत. पावसाची आनंदवार्ता देऊन त्यांना किती समाधान मिळत असेल, हे आता आम्हाला कळले. ग्रिल्स यांनी विचारले, तुम्ही कधी निराश होता का? तेव्हा ते म्हणाले, नैराश्य कसे येते? याची मला कल्पना नाही. मी प्रत्येक गोष्टीत आशा बाळगतो. तरुणांना सांगू इच्छितो, आपण आयुष्य तुकड्यात समजून घेऊ नये. आयुष्याकडे पूर्णत्वाने पाहावे. पुढील ध्येय गाठता येतील. कार्यक्रमादरम्यान, निसर्ग व झाडांविषयीच्या प्रश्नावर मोदी म्हणाले, भारतात प्रत्येक रोपट्याला देव मानतात. वर्षातून एकदा तुळशीचा कृष्णाशी विवाह करतात आणि तुळशीला कुटुंबाचा सदस्य मानतात. आम्ही हौसेखातर निसर्गाचे शोषण करत आहोत. येथेच समस्यांना सुरुवात होते. स्वच्छतेच्या प्रश्नावर ते म्हणाले, बाहरून येऊन कोणी स्वच्छता करणार नाही. आम्हाला सामाजिक परंपरेची स्वच्छता करावी लागणार आहे.

कुणाला मारणे माझ्या संस्कारात नाही : सुरक्षेवर मोदींचे उत्तर

लाकूड आणि चाकूच्या मदतीने ग्रिल्स सुरक्षेसाठी शस्त्रे तयार करतात. त्यांनी सुरक्षेसाठी एक भाला तयार करून माेदींना दिला. तो देताना ग्रिल्स म्हणाले की, तुम्ही देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती आहात. तुमची सुरक्षा ही माझी प्राथमिकता आहे. यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, देवावर विश्वास ठेवा, तो सर्वांची मदत करतो. कुणालाही मारणे माझ्या संस्कारात नाही. मात्र, तुमच्या सुरक्षेसाठी मी हे माझ्या जवळ ठेवून घेतो.’

X
COMMENT