आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृणमूलचा कार्यकर्त्यांना संदेश : घराघरांत जाऊन लाेकांना सांगा, ममतांना राेखण्यासाठी माेदींकडून सीबीअायचा वापर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - कोलकाता शहरात मधोमध धर्मातला अाहे. १२ वर्षांनंतर ममता बॅनर्जी पुन्हा धरणे अांदाेलनाला बसल्या अाहेत. फरक फक्त इतका की ममता तेव्हा विराेधी पक्षनेत्या हाेत्या अाणि सिंगूर खटल्याच्या सीबीआय तपासासाठी २४ दिवस धरणे अांदाेलनाला बसल्या हाेत्या. हे अांदाेलन पश्चिम बंगालच्या सत्तेपर्यंत पाेहाेचण्यात सहायक ठरले. अाता त्या मुख्यमंत्री अाहेत अाणि सीबीआय तपासाविराेधात धरणे अांदाेलन करत अाहे. 


ममता धर्मातला येथून राज्य चालवत अाहेत. येथे टेंटमध्येच कॅबिनेटची बैठक झाली. तसेच ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल पाेलिसांच्या कार्यक्रमालाही गेल्या. या सर्व प्रकरणात सर्वाधिक चर्चा राहिली ती पाेलिस अायुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीची. रविवारी संध्याकाळी सीबीआय व काेलकाता पाेलिस यांच्यात सुरू असलेला वाद अचानक ममता सरकार विरुद्ध माेदी सरकारमध्ये बदलला. काेलकाता पाेलिस अायुक्त राजीव कुमार यांची चाैकशी करण्यासाठी सीबीअायचे पथक गेल्याच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी अांदाेलन सुरू केले. अाता या प्रकरणाचा लाभ भाजप, तृणमूल कांॅग्रेस, डावे पक्ष व कांॅग्रेस घेण्याचा प्रयत्न करत अाहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावल्याची शक्यताही व्यक्त केली जात अाहे. तृणमूल कांॅग्रेसने जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांना संदेश दिला अाहे. त्यात म्हटले की, ममता बॅनर्जी यांचे राष्ट्रीय पातळीवर पडणाऱ्या पावलामुळे माेदी सरकार घाबरले अाहे. भाजपच्या विरोधात असलेल्या २० पेक्षा जास्त पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला अाहे. यामुळे तृणमूल कांॅग्रेसला बदनाम करण्यासाठी निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी तपास संस्थांचा दुरुपयोग केला. या संदेशानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तीन वाजेपर्यंत अापअापल्या जागी उभे राहून विराेध प्रदर्शन केले. दुसरीकडे ममता बॅनर्जी ४० हजार काेटींच्या चिटफंड घोटाळ्यात सहभागी अाहे, असा संदेश भाजप अापल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाेहाेचवण्याचा प्रयत्न करत अाहे. घोटाळ्याचा तपास हाेऊन गरिबांना पैसे परत मिळावे, हे ममता बॅनर्जी यांना नकाे अाहे. राज्यातील कांॅग्रेस व डावे पक्ष तृणमूल व भाजप एकच पक्ष असल्याची टीका करत अाहे. दाेघांना या घोटाळ्यात अडकलेल्या लाेकांवर कारवाई नकाे अाहे. त्यांना फक्त व्हाेटबंॅकेचे राजकारण हवे अाहे. शारदा चिटफंड घोटाळ्यात अाराेपी असलेले तृणमूलचे खासदार कुणाल घाेष यांना चाैकशी दरम्यान राजीव कुमार यांनी कसा व्यवहार केला? असा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, राजीव कुमार निःपक्ष अधिकारी नाही. जर ते निःपक्ष असते तर या घाेटाळ्यातील सर्व अाराेपी पकडले गेले असते अाणि मला टॉर्चर केले गेले नसते. त्यांच्यामुळे हा कट रचणारे सर्व जण स्वत:ला सुरक्षित समजत अाहेत. सर्वसामान्य व्यक्तींच्या मतानुसार, राजीव कुमार यांनी चौकशीसाठी सीबीआयला सामोरे गेले पाहिजे. दुरुपयाेगाचा अाराेप करून चाैकशीपासून लांब राहण्याची प्रवृत्ती चांगली नाही. 


दरम्यान, केंद्र सरकारने निझाम प्लेस व सीजीओ कॉम्प्लेक्समधील सीबीआय कार्यालयाची सुरक्षा वाढवली अाहे. येथे सीबीअायचे अधिकारी राजीव कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यासाठी कागदपत्रे जुळवत अाहे. दुपारी कोलकाता सीबीआय संयुक्त डायरेक्टर पंकज श्रीवास्तव दिल्लीकडे रवाना झाले. 
 

बातम्या आणखी आहेत...