आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi Will Be Participating In 6 Conferences In 36 Hours, Participants Of 18 Leaders

मोदी 36 तासांत 6 परिषदांत होतील सहभागी,18 नेत्यांची घेणार भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिंगापूरला पोहोचतील. तेथे ते ३६ तासांत एकापाठोपाठ एक शिखर परिषदांत तसेच कार्यक्रमांत भाग घेतील. १८ देशांच्या नेत्यांच्या भेटीसह अनेक देशांशी द्विपक्षीय चर्चा करतील. मोदी बुधवारी सर्वात आधी सिंगापूर फिनटेक फेस्टिव्हलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

 

तेथे ते आशियान देशांची बँकिंग यंत्रणा एका मंचावर आणण्यासाठी एपीआयएक्स 
सॉफ्टवेअर लाँच करतील. संध्याकाळी ते विभागीय सर्वंकष आर्थिक भागीदार (आरसीआपी) सहभागी होतील. तीत १६ देशांचे नेते सहभागी होतील. मोदी १३ वी आशिया परिषद (ईएएस), आशियान-इंडिया ब्रेकफास्ट परिषदेतही भाग घेतील. 

 

पूर्व-आशिया परिषद: १८ सदस्य देश, हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षेबाबत होणार चर्चा  
पूर्व-आशिया परिषद हिंद-प्रशांत देशांचा मंच आहे. त्यात १० आशियान देश आणि भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, आॅस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया हे ८ चर्चा भागीदार देश आहेत. स्थापना २००५ मध्ये झाली होती. संघटना हिंद-प्रशांत भागात राजकीय, सुरक्षा, व्यापार आदी क्षेत्रांत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मोदी परिषदेत पाचव्यांदा सहभागी होतील. ते सदस्य देशांशी माहिती, स्मार्ट सिटी, सागरी सहकार्य, शिक्षण, वित्त, पर्यावरण, ऊर्जा, दहशतवादावर चर्चा करतील.  

 

आशियान-इंडिया ब्रेकफास्ट : भारताचा आशियान देशांच्या निर्यातीत १२.८% वाटा 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आशियान-इंडिया ब्रेकफास्ट परिषदेत १० सदस्य देशांसोबत परस्पर संबंधांचा आढावा घेतील. २०१७-१८ मध्ये भारत आणि आशियान देशांत ६ लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला. त्यात भारताचा वाटा १०.५८% तर आशियान देशांना झालेल्या निर्यात साहित्यात ११.२८% वाटा होता. जानेवारीत भारत आशियान देशांसोबत भागीदारीची २५ वर्षे झाल्यानिमित्त परिषद आयोजित करेल. २६ जानेवारीला सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख प्रमुख अतिथी असतील. त्यामुळे भारत आणि आशियानमधील संबंध आणखी बळकट होतील.

 

आरसीईपी : १६ सदस्य देशांत जगाचा एकूण ४०% व्यापार  
मोदी आरसीईपी परिषदेत सदस्य देशांतील परस्पर करारांचा आढावा घेतील. सदस्य देशांत मुक्त व्यापार कराराचा प्रस्ताव देतील. आरसीईपीमध्ये ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, फिलिपाइन्स, लाओस आणि व्हिएतनाम हे १० आशियान देश आणि भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे ६ एफटीए देश आहेत. जर या देशांत मुक्त व्यापार करार झाला तर त्यामुळे जगातील ४५% लोकसंख्या कव्हर होईल. सदस्य देशांत जगातील ४०% व्यापार होतो. तो जगाच्या जीडीपीचा ३४% आहे. त्यांचे एकूण उत्पन्न १५५ लाख कोटी रु. आहे. मुक्त व्यापाराबाबत सदस्यांत २०१२ पासून २४ वेळा चर्चा झाली आहे.   

 

इंडिया-सिंगापूर हेकाथॉन: जगातील ४० चमू, मोदींच्या सूचनेवरून उपक्रम
मोदी पहिल्या इंडिया-सिंगापूर हेकाथॉन-२०१८ च्या विजेत्यांना सन्मानित करतील. त्यात ४० चमू भाग घेत आहेत. त्याचा शुभारंभ सोमवारी झाला. मोदींनी या वर्षी जूनमध्ये सिंगापूर दौऱ्यात पंतप्रधान ली सीन लोंग यांना हेकाथॉनची सूचना केली होती. सिंगापूरमधून नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठ आणि भारतातून भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद हेकाथॉनचे नेतृत्व करत आहेत. जगातील ४० चमू हेकाथॉनमध्ये भाग घेत आहेत.   

 

फिनटेक फेस्टिव्हल : बँकेत खाते नसलेल्या जगातील २ अब्ज लोकांना बँकेशी जोडणारे सॉफ्टवेअर होणार लाँच 
मोदी तिसऱ्या सिंगापूर फिनटेक परिषदेत भाषण देतील. तसे करणारे ते देशाचे पहिले पीएम असतील. हा आर्थिक तंत्रज्ञानावरील जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. त्यात ३० हजार लोक भाग घेत आहेत. मोदी एपीआयएक्स बँकिंग सॉफ्टवेअरही लाँच करतील. ज्यांचे बँक खाते नाही अशा जगातील २ अब्ज लोकांना जोडणे हा त्याचा उद्देश आहे. परिषदेत ४०० एक्झिबिटर्स आले आहेत. हैदराबाद, कोलंबो आणि लंडनच्या तज्ज्ञांनी एपीएक्स तयार केले आहे.   

बातम्या आणखी आहेत...