आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी १२५ सभांत ५०० जागा कव्हर करणार,यूपीत २० सभा ; भाजपकडून प्रचार मोहिमेला अंतिम रूप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजप निवडणुकीच्या प्रचार मोहिमेला अंतिम रूप देत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्या देशभर होणाऱ्या सभा आणि रोड-शोचा कार्यक्रमही बनवला जात आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार, मोदी देशभरात १००-१२५ सभा घेतील. मोदींच्या सर्वाधिक सभा यूपी, प. बंगाल आणि बिहारमध्ये होतील. या राज्यांत ७ टप्प्यांत मतदान आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा १०० ते १२५ जागा आणि रोड-शो करू शकतात. शहा हे मोदींएवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त सभा घेऊ शकतात. मात्र, आतापर्यंतच्या योजनेनुसार भाजपच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या १२५-१२५ सभांची रूपरेषा तयार केली आहे. मोदी सर्वाधिक २० सभा यूपीत घेऊ शकतात. ते ५४३ पैकी ५०० जागा या सभांद्वारे कव्हर करतील.

 


त्यांचा कार्यक्रम अशा प्रकारे तयार केला जात आहे की त्यात प्रत्येक टप्प्यात लहान राज्यात किमान एक सभा आणि मोठ्या राज्यात दोन ते तीन जाहीर सभा घेता येतील. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला २० राज्यांतील ९१ जागांवर मतदान आहे. पहिल्या टप्प्याच्या या राज्यांत मोदी २९ किंवा ३० मार्चपासून सभा घेण्यास सुरुवात करतील. 

 

 

अशी चालणार मोहीम
> क्लस्टर बनवले, एकात तीन ते चार लोकसभा जागा

भाजपने ७ टप्प्यांसाठी जागांचे क्लस्टर बनवले आहे. त्यात एका क्लस्टरमध्ये ३ ते ४ लोकसभा जागा आहेत. क्लस्टरनुसार मोदींच्या यूपीत २०, बिहारमध्ये १०, पश्चिम बंगालमध्ये १०-११, ओडिशात ५ सभांची शक्यता आहे. निवडणूक ७ टप्प्यांत आहे. त्यामुळे ७८ सभा होतीलच, काही राज्यांत ते २-३ वेळा सभा घेतील. अशा प्रकारे हा आकडा १०० ते १२५ पर्यंत पोहोचत आहे. 

 

रणनीती : भाजप नेते घेणार १५० ते २०० पत्रपरिषदा

भाजपची रणनीती निवडणूक पूर्णपणे केंद्रीय स्तरावर ठेवण्याची आहे. स्थानिक स्तरावर खासदारांच्या विरोधातील रोष कमी व्हावा हा हेतू. मोदी प्रचार मोहिमेत मध्येच ‘पहिले मत मोदींना’ या मोहिमेअंतर्गत युवकांशी थेट संवादही साधतील. दोन महिन्यांच्या प्रचार मोहिमेत जवळपास प्रत्येक पंधरवड्याला भाजपचे केंद्रीय नेते एकाच वेळी १५० ते २०० जागी पत्रकार परिषदांद्वारे कार्पेट बॉम्बिंग करतील अशी रणनीती तयार केली आहे. 

 

२०१४ ची मोहीम : मोदींनी ४३७ सभा घेतल्या होत्या

२०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मोदींनी १३ सप्टेंबर २०१३ ते १० मे १४ पर्यंत देशात ३ लाख किमीपेक्षा जास्त प्रवास करून ४३७ सभा घेतल्या होत्या. देशभर ‘चाय पर चर्चा’, थ्री-डी सभांसह मोदी केंद्रित ५८२७ कार्यक्रम केले होते. मोदींनी यूपीत ७९ सभा घेतल्या होत्या. त्यांची पहिली सभा १५ सप्टेंबरला हरियाणाच्या रेवाडीत तर  १० मे २०१४ ला यूपीच्या बलियात शेवटची सभा झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...