आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिनी माझे सर्व सोशल अकाउंट्स महिलांना समर्पित करणार; 'त्या' ट्वीटवर नरेंद्र मोदींचे स्पष्टीकरण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी सोमवारी रात्री 8.56 वाजता ट्वीट केले होते- 'रविवारपर्यंत सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहे'
  • त्यानंतर #NoSir टॉप ट्रेंडिंगमध्ये आले होते, युजर्सनी मोदींना सोशल मीडिया न सोडण्याची विनंती केली होती

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 मार्चला एक दिवसासाठी आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट्स महिलांना समर्पित करणार आहेत. याबाबत त्यांनी आज(मंगळवार) ट्वीट करुन माहिती दिली. त्यांनी लिहीले- "या महिला दिनी मा माझे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स त्या महिलांना समर्पित करणार आहे, ज्यांचे नाव आणि आयुष्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे या महिला लाखो लोकांना धैर्य देऊ शकतील. अशा प्रेरणादायी महिलांबद्दल तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही #SheInspiresUs वर त्यांची गोष्ट शेअर खरा.

मोदींनी #SheInspiresUs लिहून ट्वीट केले


मोदींनी जे पोस्टर शेअर केले, त्यात लिहीले की, ''तुमच्याकडे नरेंद्र मोदींचे सोशल मीडिया अकाउंट्स एक दिवस वापरण्याची संधी आहे. तुमचे नाव आणि काम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे का ? तुम्ही अशा एखाद्या महिलेला ओळखता का, जिने आपल्या आयुष्यात काही वेगळं केलं आहे? तर मग #SheInspiresUs लिहून त्या महिलांची गोष्ट शेअर करा किंवा फेसबूक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर पोस्ट करा. काही निवडक महिलांना नरेंद्र मोदींचे सोशल मीडिया अकाउंट्स टेकओवर करुन जगासमोर आपले विचार मांडण्याची संधी मिळेल.मोदींनी सोमवारी रात्री 8.56 वाजता एक ट्वीट करुन सर्वांनाच धक्का दिला होता. त्यात त्यांनी लिहीले की, "रविवारपर्यंत फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यू-ट्यूब सोडण्याचा विचार करततोय. याबाबत लवकरच माहिती देईल." सांगू इच्छितोत की, मोदींचे ट्विटरऴर 5.33 कोटी, फेसबूकवर 4.46 कोटी, इंस्टाग्रामवर 3.52 कोटी आणि यू-ट्यूबवर 45 लाख फॉलोअर्स आहेत.