आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्‍क पेट्रोल भरण्‍यासाठी पोहोचला घोडा, महिला कर्मचारीही चक्रावली, मग करावेच लागले टँक फुल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्‍हायरल होत आहे. यात पेट्रोल पंपावर एक महिला कर्मचारी उभी असते तेव्‍हाच पंपावर एक घोडा येतो तेही चक्‍क पेट्रोल भरवून घेण्‍यासाठी. घोड्यावर स्‍वार असलेला चालक जेव्‍हा महिला कर्मचा-याला पेट्रोल भरण्‍यास सांगतो तेव्‍हा सुरूवातीला नेमके तो काय सांगतोय हेच कळत नाही. तसेच घोड्याच्‍या त्‍या रथाला पेट्रोलची काय गरज? असेच तिचे हावभाव दिसतात. नंतर तिच्‍या लक्षात येते की, ही मॉडीफॉईड केलेली बाईक आहे.

 

तरीही पेट्रोल नेमके कुठे भरायचे हे काही तिच्‍या लक्षात येत नाही. जेव्‍हा चालक तिला त्‍याबद्दल सांगतो तेव्‍हा तरूणी हसूनहसून लोटपोट होते. सोशल मीडियावर रितेश देसाई नावाच्‍या युझरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

पेट्रोल डालने वाली हैरान है पेट्रोल कहा डालने का👇😂 pic.twitter.com/ZYNxkdvCE0

— Ritesh Desai (@riteshadesai) September 21, 2018

 

बातम्या आणखी आहेत...