आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi's 2 day Visit From Today, Will Attend Port Trust Event, Launch Of Historic Buildings

मोदींचा 2 दिवसीय दौरा आजपासून, पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्रमात होणार सामील, ऐतिहासिक इमारतींचे लोकार्पणदेखील करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलकाता : पंतप्रधान नरेंद्र माेदी शनिवारपासून (११ जानेवारी) दाेनदिवसीय पश्चिम बंगालच्या दाैऱ्यावर आहेत. या भेटीत त्यांच्या हस्ते विविध विकासकामे व प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे. करन्सी बिल्डिंग, बेल्वेडेरे हाऊस, मेटकाप हाऊस, व्हिक्टाेरिया मेमाेरियल हाॅल या इमारतींचे लाेकार्पण ते करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी समर्थक सज्ज झाले आहेत.

या दाैऱ्यात माेदी काेलकाता पाेर्ट ट्रस्ट संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी हाेतील. या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे व निवृत्तांच्या वेतनाचा प्रश्न साेडवण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी पंतप्रधान सुमारे ५०० काेटी रुपयांच्या निधीची भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माेदींच्या हस्ते काैशल्य विकास केंद्र व प्रीतीलता छत्री आवास या प्रकल्पाचे लाेकार्पणही हाेणार आहे. सुमारे २०० आदिवासी विद्यार्थिनींसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. सुंदरबन येथील मुलींना त्याचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येणार आहे. या दाैऱ्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कडेकाेट बंदाेबस्त 

पंतप्रधान माेदींच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांच्या मार्गावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यातच तीन संघटना विमानतळावर आणि काही मार्गांवर काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचे सांगण्यात आले. बॅरिकेड्सबराेबरच जास्तीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

तृणमूलच्या अभियानाला प्रत्युत्तर देण्याची याेजना

तृणमूल काँग्रेसने नव्या नागरिकत्व कायद्यावरून भाजप सरकारला लक्ष्य करण्याचे काम केले आहे. त्यासाठी अभियान राबवले आहे. म्हणूनच आता तृणमूलला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी स्थानिक भाजप पदाधिकारी पंतप्रधानांची या दाैऱ्यात भेट घेण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...