आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा बायोपिक वादाच्या भोवऱ्यात, जावेद अख्तर यांनी केला मोठा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचा ट्रेलर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नुकताच प्रदर्शित करण्यात आला खरा पण हा सिनेमा आता वादात आला आहे. या सिनेमाच्या टायटलमध्ये गीतकार म्हणून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. पण या सिनेमासाठी आपण कोणतेही गीत लिहिले नसल्याचे जावेद अख्तर यांनी ट्वीट करून सांगितले. 

 


सध्या सोशल मीडियावर या सिनेमाचे पोस्टर शेअर करण्यात आले. यामुळे ऐन निवडणूकीच्या काळात हा सिनेमाची चर्चा होत आहे. अशातच जावेद अख्तर यांनी या बायोपिकसाठी एकही गाणं लिहीलं नसतांना त्यांच्या नावाचा वापर केल्यामुळे सिनेमा आणखीनच चर्चेत आला आहे.  

 

Am shocked to find my name on the poster of this film. Have not written any songs for it ! pic.twitter.com/tIeg2vMpVG

— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) 22 March 2019

 

'मोदींच्या बायोपिकमध्ये माझे नाव पाहून मला धक्का बसला. पण मी या सिनेमासाठी एकही गाणे लिहीले नाही.' असे ट्वीट जावेद अख्तर यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...