आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिपदाच्या वाट्यावरून टीका अनाठायी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘महाराष्ट्राला अच्छे दिन नाहीतच’(दिव्य मराठी 27 मे) ही पहिल्या पानावरील बातमी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे. नरेंद्र मोदींनी खरे तर आधीच जाहीर केले होते. मंत्रिमंडळाचा आकार लहान असेल. महाराष्ट तून भाजप-शिवसेना युतीचे 42 खासदार निवडून आले, त्यापैकी ६ जणांना मंत्रिपदे मिळाली. याउलट गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगडला प्रत्येकी एक मंत्रिपद वाट्याला आले. तसेच दिल्लीतील 4 जणांना मंत्रिपद मिळाले. मोदींकडून खूप चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजेत, अशी जनतेची अपेक्षा आहे. नेमके याच गोष्टीचे मोदींना भान आहे. त्याचमुळे त्यांनी राजकीयदृष्ट्या परिपक्व, स्वच्छ, कर्तबगार आणि बुद्धिमान लोकांनाच आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतले आहे. याचे उदहरण द्यायचे म्हटले तर जनरल व्ही. के. सिंग, पीयूष गोयल, डॉक्टर जितेंद्र सिंग ज्यांनी वैद्यकशास्त्रावर ७ पुस्तके लिहिली. या सर्वांना मोदींनी निवडले. त्यामुळे यासंदर्भात करण्यात येणारी टीका अनाठायी वाटते.