आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi's Cabinet Sworn In A Grand Ceremony In Rashtrapati Bhavan, Presence Of Shahid's Family

मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी : राष्ट्रपती भवनातील भव्य सोहळा, या दिग्गजांची उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राष्ट्रपती भवनात गुरुवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नूतन मंत्र्यांच्यां शपथविधी समारंभात देश-विदेशातील सुमारे ८ हजार पाहुणे सहभागी झाले होते. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधीही सहभागी झाले होते. उद्योग क्षेत्रातील रतन टाटा, मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी, नारायणमूर्तीही राष्ट्रपती भवन परिसरात सहभागी झाले होते. पार्श्वगायिका आशा भाेसले, अभिनेता रजनीकांत, रामभद्राचार्य, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, जग्गी वासुदेव, साध्वी ऋतुंभरा, स्वामी अवधेशानंद, कैलाश सत्यार्थी यांचीही उपस्थिती होती. 


शहिदांच्या कुटुंबीयांचीही उपस्थिती : पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचे कुटुंब व पश्चिम बंगालमध्ये ठार झालेल्या ५४ भाजप कार्यकर्त्यांचे कुटुंबीयदेखील या समारंभात सहभागी झाले होते.

सर्वात मोठा समारंभ : राष्ट्रपती भवनातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा समारंभ ठरला. २०१४ मध्ये मोदींनी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमक्ष पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तेव्हा सार्क देशांच्या प्रमुखांसह ३५०० पाहुणे उपस्थित होते. राष्ट्रपती भवनातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम ठरला आहे. नेहमी ३५०० ते ५००० पाहुणे येत असत.यंदा ही संख्या आतापर्यंतची सर्वात जास्त आहे.  असे राष्ट्रपती भवनाचे प्रवक्ते अशोक मलिक यांनी सांगितले. 


दोन तास चाललेल्या कार्यक्रमात ८ देशांचे राष्ट्रपती, पीएमसह ८ हजार पाहुणे सहभागी

बापूंच्या आदर्शांना लोकप्रिय करण्याची हीच वेळ 
मोदी सकाळी पहिल्यांदा राजघाटावर गेले. तेथे त्यांनी बापूंना श्रद्धांजली अर्पण केली. ते ट्विट करून म्हणाले, महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने त्यांचे आदर्श लोकप्रिय करण्याची हीच योग्य वेळ आहे.

 

विशेष पाहुणे-

 

विरोधी नेतेही कार्यक्रमात सहभागी 
शपथग्रहण समारंभात लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षांतील अनेक नेते समारंभाला आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर परदेशातून आलेले राष्ट्राध्यक्ष व विशेष निमंत्रितांना राष्ट्रपती भवनातील डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले.


भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग पत्नीसह दाखल
भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग सपत्नीक समारंभात सहभागी झाले होते. नवी दिल्लीत परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी त्यांचे स्वागत केले. मोदी १५-१६ जून २०१४ रोजी भूतानला गेले होते. पंतप्रधान झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिल्याच परदेश दौरा होता. 


श्रीलंका, बांगलादेश, नेपाळचे प्रमुखही हजर 
श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना पत्नी जयंती पुष्पकुमारी यांच्यासह कार्यक्रमास उपस्थित होते. सिरिसेना भारत समर्थक आहेत. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा आेली व  बांगलादेशचे राष्ट्रपती माेहंमद हमीद या समारंभात सहभागी झाले होते. 


म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंटही पाहुणे
म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंटही कार्यक्रमात सहभागी झाले. ते म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. स परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी ट्विट करून म्हणाले, हा अॅक्ट ईस्ट पॉलिसीचा भाग आहे.


दिग्गजांची हजेरी

 

टाटा, अंबानी, अदानी, महिंद्रांसह उद्योजक 
मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानींसह सहभागी झाले. त्याशिवाय रतन टाटा, गौतम अदानी, एन. आर. नारायणमूर्ती, आनंद महिंद्रांसह उद्योग जगतातील अनेक दिग्गजांनी मोदींच्या शपथ समारंभाला हजेरी लावली होती. 


साधेपणाने सायकलवर स्वार होत मनसुख मंडावियांचे आगमन 

गुजरातचे राज्यसभा सदस्य मनसुख मंडाविया मंत्रिपदाच्या शपथेसाठी सायकलवर दाखल झाले. सायकलवर जाणे ही काही माझ्यासाठी फॅशन नाही, उलट पॅशन आहे. मी संसदेत नेहमी सायकलनेच जातो.

 

पुढिल स्लाइवर पाहा...