आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi's Class For BJP MPs; Aimed At Making New Members Aware Of Parliamentary Responsibility

भाजपच्या खासदारांसाठी माेदींचा वर्ग; उपस्थित राहण्याचे आदेश, नवीन सदस्यांना संसदीय जबाबदारीची जाणीव करून देण्याचा उद्देश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपच्या नूतन खासदारांसाठी ३ व ४ ऑगस्ट राेजी ओळख व अभ्याससत्राचे आयाेजन करण्यात आले आहे. त्यास पंतप्रधान नरेंद्र माेदी मार्गदर्शन करणार आहेत. या दाेनदिवसीय वर्गात लाेकसभा व राज्यसभेतील भाजपच्या ३०३ सदस्यांना त्यांच्या जबाबदारी समजावून सांगितली जाणार आहे. 


अभ्याससत्रात राज्यसभेचे ७८ खासदार सहभागी हाेतील. या सत्राचे उद्घाटन माेदींच्या हस्ते हाेईल. त्याशिवाय सत्राला भाजप अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे अनेक दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. दरवर्षी भाजप आपल्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयाेजन करते. बूथ ते वरिष्ठ पातळीपर्यंत सर्वांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जाेशी यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. २०१४ मध्ये भाजपचा विजय झाला हाेता. तेव्हा भाजपने हरियाणातील सूरजकुंड येथे नूतन खासदारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. जाेशी म्हणाले, चालू सत्रात संसदेच्या दाेन्ही सभागृहांनी १५ विधेयकांना मंजुरी दिली. उर्वरित सात सत्रांत आणखी ११ विधेयकांना पारित करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. संसदेच्या अधिवेशनाचा ७ आॅगस्ट राेजी समाराेप हाेणार आहे. काही विधेयके लाेकसभेत मंजूर झाली आहेत; परंतु राज्यसभेत ती अडकली. लाेकसभेत मंजूर झालेल्या विधेयकांची संख्या सहा आहे. राज्यसभेत मंजूर झालेली नाहीत. एकूण ११ विधेयके प्रलंबित आहेत. ही विधेयके मंजूर हाेईपर्यंत विराेधी पक्षांतील लाेकांनी सभागृहात उपस्थित राहावे, असेही त्यांनी सांगितले.  
 

 

विधेयकांच्या मंजुरीसाठी जास्तीत जास्त संख्येने हजर राहा : गृहमंत्री शहा

भाजप संसदीय गटाची बैठक मंगळवारी दिल्लीत झाली. या वेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या सर्व खासदारांना विविध विधेयकांच्या मंजुरीसाठी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे, असा सल्ला दिला आहे. संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बाेलत हाेते. काेणत्याही विधेयकासाठी कराव्या लागणाऱ्या मतदानात भाजप खासदारांची संख्या जास्तीत जास्त असली पाहिजे. त्यामुळे संसद सदस्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. तसेच येत्या ३ व ४ अाॅगस्ट राेजीच्या प्रशिक्षण कार्यक्रमास सर्वांनी हजर राहावे. या बैठकीत ३५-अ कलमावरही चर्चा हाेणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, भाजपचे लाेकसभेत ३०३, तर त्यांच्या सहकारी पक्षांचे सुमारे ५० सदस्य आहेत.