आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कच्चे तेल उत्पादक देशांकडे दर कमी करण्याची मोदींची मागणी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल उत्पादन करणाऱ्या देशांना जबाबदारीसह कच्च्या तेलाचे दर निश्चित करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, उत्पादक आणि खरेदीदार, दोघांच्या हिताचा हा निर्णय असेल. मोदी सोमवारी पेट्रोटेक-२०१९ कॉन्फरन्समध्ये मार्गदर्शन करत होते. त्यांनी सांगितले की, जगभरात ऊर्जेची उपलब्धता वाढत आहे. तरीदेखील १०० कोटी लोक आजही वीज आणि स्वच्छ स्वयंपाकाच्या इंधनापासून दूर आहेत. त्यांनी सांगितले की, ऊर्जेच्या मागणीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील मागणीत दरवर्षी पाच टक्क्यांची वाढ होत आहे. २०४० पर्यंत मागणी दुपटीने वाढण्याची अपेक्षा आहे.
 
महागडे तेल भारतासारख्या देशांसाठी अत्यंत नुकसानदायक आहे. भारत मागणीच्या ८० टक्के तेल आणि ५० टक्के नैसर्गिक वायूची आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते. महाग असल्यानेच पॉवर प्रकल्पात गॅसचा वापर होत नाही. वास्तविक पर्यावरणाच्या दृष्टीने कोळशाच्या तुलनेमध्ये यातून खूपच कमी प्रदूषण होते. 

 

मोदी यांनी सांगितले की, तेल आणि गॅसचा बाजार पारदर्शी होण्याची आवश्यकता आहे. देशांसमोर स्वतःच्या नागरिकांना स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे. अर्थव्यवस्थेचा तेजीने विकास साध्य करण्यासाठी ऊर्जेची योग्य किंमत आणि त्याचा पुरवठा स्थिर असायला हवा. तेल आणि गॅसची आवश्यकता स्वयंपाकघरापासून ते विमानांपर्यंत असते. तेलाबाबत स्थितीत बदल होत आहे. पश्चिमेच्या तुलनेमध्ये पूर्वेकडील देशांमध्ये ऊर्जेची मागणी जास्त तेजीने वाढत आहे. शेल ऑइलमुळे अमेरिका याचा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. अक्षय ऊर्जा स्वस्त झाली आहे. नैसर्गिक गॅसचा वापर जगभरात वाढत आहे. 
भारतात तेलाची वाढत असलेली मागणी पाहता संयुक्त अरब अमिरातीने येथे रिफाइनिंग आणि पेट्रोकेमिकल्स प्रकल्पात गुंतवणूक वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारत आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाजार असल्याचे यूएईचे मंत्री आणि सरकारी कंपनी एडनॉकचे सीईओ सुलतान अहमद अल जबेर यांनी म्हटले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...