आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi's Firm Resolve In Varanasi BJP Membership Program; Reach The Target Of $ 5 Trillion

वाराणसीतील भाजप सदस्यत्व कार्यक्रमात मोदींचा दृढ संकल्प; टीकाकार निराशावादी, पाच ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनचे उद्दिष्ट गाठू शकेल. परंतु काही लोक या उद्दिष्टावर प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. हे सर्व कशासाठी चालले आहे, असा प्रश्न ते करतायत. या लोकांना ‘व्यावसायिक निराशावादी’ म्हटले पाहिजे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. ते शनिवारी वाराणसीत भाजपच्या सदस्यत्व कार्यक्रमात बोलत होते.


पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदींनी शनिवारी दुसऱ्यांदा आपल्या मतदारसंघाला भेट दिली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त भाजपच्या सदस्यत्व अभियानाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मोदी पुढे म्हणाले, तुम्ही सामान्य माणसाला जाऊन भेटले पाहिजे. सामान्य माणूस तुम्हाला तुमच्या समस्येवरील उपाय सांगू शकेल. परंतु तुम्ही अशा निराशावाद्यांना भेटाल तर हे लोक तुमच्याकडे असलेल्या उपायाला समस्येत रूपांतरित करतील. खरे तर ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. काही लोकांना उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने भारताच्या क्षमतेवर संशय वाटू लागतो. नवा भारत वेगळा आहे. आव्हाने असली तरी आपल्यासमोर अनेक प्रकारच्या संधी आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. म्हणूनच प्रत्येकाने विकासात आपले योगदान दिले पाहिजे. हीच भारतमातेला दिलेली खरी भेट ठरेल, असे आवाहन मोदींनी केले. 
 

लालबहादूर शास्त्री यांच्या १८ फूट उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी बाबतपूर विमानतळावर दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या १८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करून आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यास सुरुवात केली. हा पुतळा नॉर्दर्न कोल फील्ड्स लि. ने (एनसीएल) सीएसआर निधीद्वारे ७० लाख रुपये खर्च करून तयार केला. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तयार करणारे प्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रींचा पुतळा तयार करण्यात आला. पुतळ्यात ८५ टक्के तांबे आहे. १५ टक्के इतर धातूंचाही वापर करण्यात आला आहे. कार्यक्रमात लालबहादूर शास्त्रींची मुले अनिल शास्त्री व सुनील शास्त्री यांचीही उपस्थिती होती. 
 

 

प्रारंभ : थ्री-डी ‘व्हर्च्युअल म्युझियम’ सुरू 
मोदींनी गंगाकिनाऱ्यावरील दशाश्वमेध घाटाजवळील मान महालात ११ कोटी रुपये खर्चून साकारलेल्या थ्री-डी व्हर्च्युअल म्युझियमचेही उद॰घाटन केले. १९ फेब्रुवारीपासून हे संग्रहालय उद॰घाटनाच्या प्रतीक्षेत होते. त्यात वाराणसीची संस्कृती, कला तसेच धार्मिक वारसा इत्यादी बाबींवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रकाश टाकण्यात आला आहे. मान महाल भारतीय पुरातत्त्व विभागाद्वारे संरक्षित आहे. ‘व्हर्च्युअल म्युझियम’ ची निर्मिती नॅशनल काैन्सिल ऑफ सायन्स म्युझियमने (एनसीएसएम) केली आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटकांना शहराची माहिती मिळेल. 
 

 

अभियान : ९ कोटी नवे सदस्य करणार 

१७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कमी मते मिळालेल्या क्षेत्रातून राष्ट्रीय सदस्यत्व अभियानाला सुरुवात झाली आहे. वाराणसी जिल्ह्यात भाजपच्या सदस्यांची संख्या सात लाखांहून जास्त आहे. एक महिन्यात ही संख्या २० टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भाजपचे ११ कोटींहून जास्त सदस्य आहेत. ९ कोटी नवीन सदस्य करून २० कोटी उद्दिष्ट साध्य करणार असल्याचा संकल्प भाजपने केला आहे. उत्तर प्रदेशात ५० लाख नवे सदस्य करणार आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकीत टक्का कमी असलेल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. 
 

बातम्या आणखी आहेत...