Home | National | Gujarat | Modi's image is better than issues, this is the only challenge for Congress

गुजरात : मोदींची प्रतिमा मुद्द्यांपेक्षा माेठी, काँग्रेससाठी हेच माेठे आव्हान

भंवर जांगिड | Update - Apr 15, 2019, 09:37 AM IST

या भागांत एकतर्फी लढत : सुरत, नवसारी या मतदारसंघांत काँग्रेसला विजय अशक्यच

 • Modi's image is better than issues, this is the only challenge for Congress


  सुरतमध्ये जीएसटीला सर्वात जास्त विरोध झाला. त्यानंतरही विधानसभा निवडणुकीत सर्व १२ जागा भाजपने जिंकल्या. जाे विराेध हाेता ताेच मतांच्या माध्यमातून भाजपला मिळाला.


  सुरत व नवसारी या दाेन्ही लाेकसभा मतदारसंघांतील व्यापार मारवाडी व काठेवाडींच्या ताब्यात आहे. सुरतमधून दर्शना बेन जरदोस व नवसारीमधून सी.आर. पाटील खासदार आहेत. काँग्रेसचे नेते चंपालाल बोथरा पक्षाचे येथे संघटन नसल्याचे मान्य करतात. व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष व भाजप नेते श्रीकृष्ण बंका म्हणतात, जीएसटी आंदोलनाच्या वेळी नेते व व्यापाऱ्यांना सांगितले हाेते, सुरुवातीला अडचण हाेईल, नंतर सवय हाेऊन जाईल. खरंच आता दाेन वर्षांत सवय झाली. सुरतमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते गाैरव श्रीमाली यांनी सांगितले की, तिकीट वाटप याेग्य पद्धतीने झाले आहे. परंतु काँग्रेसचा येथे प्रभाव नाही. जिल्हा काँग्रेसपेक्षा चांगली परिस्थिती युवक काँग्रेसची आहे. शहरातील ७२ काॅलेजमधील ५८ कॉलेजमध्ये एनएसयूआयने अभाविपच पराभव केला. विद्यापीठाच्या अधिसभेतील सहा जागांपैकी तीन ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला.


  सुरतमध्ये भाजपच्या दर्शना बेन जरदोस यांचा समान काँग्रेसच्या अशोक अधेवडा यांच्याशी आहे. नवसारीत भाजप खासदार सी.आर. पाटील यांची लढत काँग्रेसचे धर्मेश पटेल यांच्याशी हाेत आहे. तीस वर्षांपासून या दाेन्ही जागा भाजपकडेच आहेत. मोरारजी देसाई यांनी जनता पार्टी बनवल्यानंतर काँग्रेसचा पराभव केला हाेता. त्यानंतर भाजपच्या काशीराम राणा यांनी पुन्हा काँग्रेसला येऊ दिले नाही. त्यांचा वारसा आता सी.आर.पाटील सांभाळत आहेत. सुरत व नवसारीतील सात-सात विधानसभेच्या सात-सात जागांवर भाजपचे आमदार आहेत. धर्मेश पटेल कोळी-पटेल आहेत आणि येथे कोळी-पटेल व सौराष्ट्रीयन पाटीदार यांचे वर्चस्व आहे. पाटीदारांची मते एकत्र आहेत. परंतु काेळी-पटेल यांचे मतदान विखुरले आहे.


  दक्षिण गुजरातमधील बारडोली मतदारसंघाबाबत वरिष्ठ पत्रकार, हिमांशू भट्ट म्हणतात, सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या दूध व साखर उद्याेगांचा हातात हा मतदारसंघ आहे. १५०० गावे या सहकार उद्याेगाशी जुळले आहेत. चाैधरी आणि वसवा जातीचे येथे वर्चस्व आहे. दाेन्ही सहकारी संघटनांवर भाजपचे वर्चस्व आहे. काँग्रेसच्या तुषार चौधरी यांनी विजयाचा दावा केला आहे. कारण विधानसभेच्या सातपैकी तीन मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत.


  वलसाड ग्रामीण आदिवासी मतदारसंघ आहे. भाजपने विद्यमान खासदार के.सी. पटेल यांना उमेदवारी दिली. परंतु त्यांचे लहान भाऊ डी.सी. पटेल झाले. त्यांना उमेदवारी हवी हाेती. विधानसभा निवडणुकीदरम्यान हार्दिक, अल्पेश व जिग्नेश यांच्या तिकडीमुळे काँग्रेसचे मते वाढली हाेती. काँग्रेसने आमदार जितू चाैधरी यांना उमेदवारी दिली आहे. आता अल्पेश यांनी काँग्रेस साेडल्याचा परिणाम हाेणार आहे.

  भरूचमध्येे काँग्रेसच्या अहमद पटेल यांनी कधी हॅट््ट्रिक केली हाेती. १९८४ मध्ये पराभूत झाल्यानंतर पुन्हा काँग्रेस निवडून आली. येथे तिरंगी लढत आहे. विधानसभेत भाजपचे तीन तर काँग्रेस व भारतीय ट्रायबल पार्टीचे २-२ आमदार आहेत. भाजपने खासदार मनसुख वसावा यांना तिकीट दिले आहे. काँग्रेस छाेटूभाई वसावा यांच्या भारतीय ट्रायबल पक्षाच्या मदतीने वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु यश आले नाही. छोटू वसावा यांचा प्रभाव चार लाख मतांवर आहे. अहमद पटेल यांना राज्यसभेत पाठवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. काँग्रेसने शेरखान पठाण यांना उमेदवारी दिल्याने तिरंगी लढत हाेणार आहे. यात विजय काेणाचा हे २३ मेला समजणार आहे.


  मुद्दे, जे प्रभावी ठरणार आहेत

  येथे राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा आहे. परंतु त्यापेक्षा माेदी यांची प्रतिमा माेठी आहे. नोटबंदी आणि जीएसटीचा विराेध विधानसभा निवडणुकीतच भाजपसाठी नुकसानकारक ठरले नाही. भरूचमध्ये काॅलव्याद्वारे फक्त २५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. यामुळे सिंचनाचा प्रश्न माेठा आहे. बारडोलीतील आदिवासी भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे.


  जातीय समीकरण काय आहे?

  सुरत, नवसारी व वलसाडमध्ये राजस्थानी, मराठी आणि यूपी-बिहारमधील लाेक आहेत. यामुळे जातीचा फॅक्टर प्रभावी दिसत नाही. इतर जागांवर पाटीदार, कोळी व वसावा निर्णायक आहेत. पाटीदार थोडेे भाजपकडे तर काही काँग्रेसकडे दिसून येतात. कोळी पटेलांना काँग्रेसने संधी दिली आहे. यामुळे ते मतदार काँग्रेसकडे जाऊ शकतात. वसावा दलित आहेत, ते भाजपबराेबर असतील.

  आघाडीची स्थिती
  काँग्रेसची संघटना कमकुवत आहे. त्यातच छोटू वसावा यांच्या भारतीय ट्रायबल पक्षासाेबत आघाडी हाेऊ शकली नाही.

Trending