आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi's Second Tweet In 16 Hours Will Not Leave Social Media, Accounts Dedicated To Inspiring Women

16 तास 20 मिनिटांनी मोदींचे दुसरे ट्विट - सोशल मीडिया सोडणार नाही, अकाउंट्स प्रेरक महिलांकडे

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत असल्याचे ट्विट केल्याच्या १६ तास २० मिनिटांनी माेदींनी चित्र स्पष्ट केले. मंगळवारी ट्विटमध्ये ते म्हणाले, ‘या महिलादिनी मी आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट्स ज्यांचे आयुष्य व कामे आपल्याला प्रेरित करतात, अशा महिलांना समर्पित करणार आहे. यामुळे या महिला लाखो लोकांचे मनोबल उंचावण्यात मदत करू शकतील. तुम्हीही अशाच महिलांपैकी एक असाल किंवा इतरांसाठी प्रेरक ठरणाऱ्या महिलांची तुम्हाला माहिती असेल तर त्यांची कहाणी हॅशटॅग शी इन्स्पायर्स अस’ वर शेअर करा.’

मोदींनी सोमवारी रात्री ८.५६ वाजता ट्विट करून महिलादिनी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. मंगळवारी दुपारी १.१६ वाजता त्यांनी दुसरे ट्विट करून अटकळींना विराम दिला.

बातम्या आणखी आहेत...