आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - 2003 साली ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'मोहब्बते' या चित्रपटातील अभिनेत्री प्रीती झंगियानी 38 वर्षांची झाली आहे. 18 ऑगस्ट 1980 रोजी मुंबईतील सिंधी कुटुंबात प्रीतीचा जन्म झाला. प्रीती सर्वप्रथम राजश्री प्रॉडक्शनच्या 'ये है प्रेम' या म्युझिक अल्बममध्ये अॅक्टर अब्बाससोबत झळकली होती. त्यानंतर तिची 'छुई मुई सी तुम लगती हो' आणि 'कुडी जच गई' ही गाणी फारच लोकप्रिय झाली. प्रीतीने निरमा साबण आणि इतर काही जाहिरातीही केल्या.
2008 साली प्रीतीने केले अभिनेत्यासोबत थाटले लग्न..
- प्रीतीने 23 मार्च, 2008 रोजी मॉडेल आणि अभिनेता प्रवीण डबासबरोबर लग्न केले. 11 एप्रिल 2011 रोजी तिच्या पहिल्या बाळाला जन्म झाला. त्याचे
नाव जयवीर आहे. 27 सप्टेंबर 2016 ला प्रीती दुसऱ्यांदा आई बनली. बाळाचे नाव देव असे ठेवण्यात आले. प्रीती सध्या तिच्या कुटुंबासोबत बांद्रा येथे राहते. ती सध्या चित्रपटांपासून दूर आहे.
- प्रवीण डबास मीरा नायरच्या 'मान्सून वेडींग' या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. त्याने दिल्ली येथील हंसराज कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे.
- अभिनेताव्यतिरीक्त प्रवीण स्कुबा ड्रायव्हिंगही करतो. त्याला अंडरवॉटर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचीही आवड आहे.
आफताबसोबत अफेअरच्या झाल्या चर्चा..
- प्रवीणअगोदर प्रीती फिरोज नाडियाडवालाचा लहान भाऊ मुश्ताकसोबत एंगेज्ड होती. पण काही दिवसांनी दोघे वेगळे झाले.
- 'आवारा पागल दीवाना'मध्ये सोबत काम केल्यानंतर प्रीती आणि आफताब यांच्यात अफेअर असल्याची चर्चा सुरु होती. पण अशाप्रकारच्या बातम्या केवळ अफवा आहेत असे तिने सांगितले होते.
पुढे वाचा, प्रीतीविषयी आणखी बरंच काही...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.