आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतझड सावन बसंत बहार... मोहंमद अझीझ यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - १९८०-९० च्या दशकातील लाेकप्रिय पार्श्वगायक मोहंमद अझीझ (६४) यांचे मंगळवारी निधन झाले.  नानावटी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. प. बंगालच्या अशोकनगरमध्ये २ जुलै १९५४ रोजी जन्मलेल्या अझीझ यांनी ज्योती या बंगाली चित्रपटातून आपली कारकीर्द सुरू केली. १९८४ मध्ये ते मुंबईत आले. अंबर चित्रपटात त्यांनी पहिले गीत गायले. संगीतकार अनू मलिक यांनी त्यांना अमिताभ बच्चन अभिनीत मर्द चित्रपटात संधी दिली. त्यातील त्यांचे मैं हू मर्द तांगेवाला गीत लोकप्रिय झाले.

 

मोहंमद रफींसारख्या गायनशैलीमुळे ते लोकप्रिय होते. त्यांनी लाल दुपट्टा मलमल का, बंजारन, आदमी खिलौना है, लव्ह ८६, पापी देवता आदी चित्रपटांत गाणी गायली. 

 

नव्वदीचे दशक गाजवले
आजकल याद कुछ और रहता नहीं (नगीना), तेरा गम अगर न होता (दिल है बेताब), उंगली में अंगूठी (राम अवतार), पतझड सावन बसंत बहार (सिंदूर), प्यार हमारा अमर रहेगा (मुद्दत), आपके आ जाने से (खुदगर्ज), तेरा बीमार मेरा दिल (चालबाज).

बातम्या आणखी आहेत...