आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेचा दुरुपयाेग नकाे; सरसंघचालक माेहन भागवत यांचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - लाेकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लाेकशाही आघाडीला देशभरातील जनतेने पुन्हा काैल दिला असून, संघासह भाजप व रालाेआवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्रातील रालाेआ सरकारची जबाबदारी वाढली असून, या सरकारने यापुढे अधिकाधिक लाेककल्याणाची कामे करावीत. तसेच देशाला विकासाकडे न्यावे व सत्तेच्या अहंकारापासून दूर राहून सत्तेचा दुरुपयाेग करू नये, असा इशारा संघप्रमुख माेहन भागवत यांनी रालाेेआ सरकारला दिला. ते मंगळवारी कानपूर येथे बाेलत हाेते. 


कानपूरच्या चार दिवसांच्या दाैऱ्यावर आलेल्या संघप्रमुख भागवतांनी येथे ६०० स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, लाेकशाही व्यवस्थेत निवडून आलेल्यांना माेठे अधिकार असतात; परंतु त्यांचा दुरुपयाेग करावा, असा त्याचा अर्थ नसताे. त्यामुळे रालाेआ सरकारने जमिनीवर राहून मिळालेल्या सत्तेचा देशातील नागरिकांच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तथापि, तसे करताना सरकारची पावले डगमगू लागली तर संघ त्यांना वेळाेवेळी सकारात्मक दृष्टिकाेनातून सल्ला व मार्गदर्शन करत राहील. दरम्यान, केंद्रात माेदी सरकारने नुकतीच सत्ता स्थापन केल्यानंतर संघप्रमुख भागवतांनी रालाेआस हा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 


सत्तेचा अहंकार नकाे
तुम्ही किती चांगले काम केले व किती जणांना मदत केली, याने फारसा फरक नाही; परंतु ते करताना अहंकार नसला पाहिजे. तरच त्या कामाला अर्थ प्राप्त हाेताे. त्यामुळे काेणतेही काम करताना अहंकार ठेवू नका; अन्यथा मिळालेले सर्व काही अहंकारामुळे हिरावले जाऊ शकते. या वेळी त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधत राष्ट्रवाद, सामाजिक समानता, सेवा आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच स्वयंसेवकांनी संख्यात्मकएेवजी गुणात्मक विकासावर भर देऊन समाजप्रती समर्पणभाव ठेवला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी स्वयंसेवकांना केले.