आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपापसात भांडल्याने दोघांचेही नुकसानच

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : 'आपापसात भांडल्याने दोघांचेही नुकसान होते. परंतु हे माहिती असूनही माणूस जे करायला पाहिजे ते न करता जे करायला नको तेच करतो,' असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. माेहन भागवत यांनी मंगळवारी केले. आंतरराष्ट्रीय प्राचार्य‌‌‌ शिक्षण परिषदेच्या उद‌्घाटन कार्यक्रमात ते बाेलत हाेते.


राज्यात सत्तेच्या भांडणातील भाजप-शिवसेनेची युती तुटल्याच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते. भौतिक जगात अहंकारामुळे माणूस विचार करू शकत नाही. मी आणि माझ्या पलीकडे जाऊन विचार करीत नाही. मात्र शिक्षणामुळे हा विवेक माणसात येतो, असेही ते म्हणाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या राेज भाजपवर कठाेर शब्दांत टीका करत अाहेत. याचा संदर्भही डाॅ. भागवत यांच्या वक्तव्याला असल्याचा अर्थ काढला जात अाहे. 'भीतीमुळे माणूस नको ते बोलतो आणि करायला नको तेच करतो. लिजेंड व्यक्तीलासुद्धा विनयशील व्हावेच लागते,' असेही डाॅ. भागवत यांनी या कार्यक्रमात सांगितले. शिक्षणाची कास प्रगतीसाठी अावश्यक असल्याचेही ते म्हणाले.

प्राचार्य‌‌‌ शिक्षण परिषदेत भागवत यांचे अाशीर्वाद घेताना अानंदकुमार.

राज्यात सुपर- ३० च्या धर्तीवर केंद्रे : अानंदकुमार


महाराष्ट्रातही येत्या वर्षात सुपर-३० च्या धर्तीवर केंद्रे स्थापन करणार असल्याची माहिती गणितज्ञ आनंदकुमार यांनी दिली. सातव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शिक्षण परिषदेत सहभागी हाेण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'आज शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्याची गरज असल्याने त्याचा आराखडा आखला जात असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...