आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mohasina Sayyad Madhurima Article About Misses India Pride Of Nation Sonam Gupta

‘साेनम : प्राइड ऑफ नेशन’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहसीना सय्यद  

‘मिसेस इंडिया प्राइड ऑफ नेशन’चा किताब मिळवल्यानंतर तिला तो किताब नुसताच मिरवणं सहज शक्य होतं. मॉडेलिंग,फॅशन शो, बॉलीवूडचे दरवाजेही तिच्यासाठी उघडले गेले असते. मात्र, तिनं वेगळी वाट निवडली. देशातल्या अनाथांसाठी यथाशक्ति मदत करणाऱ्या सोनम गुप्ताचा हा वेगळा प्रवास... 
रविवारचा दिवस होता. औरंगाबादच्या दारुल अमान ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या ‘बैतूल यतीम’ अनाथालयाच्या गेटसमोर अचानक एक आलिशान कार थांबते. कारमधून बाहेर पडलेली सुंदर महिला अनाथालयात जाऊन स्वत:चा परिचय देते. मी सोनम गुप्ता दिल्लीहून आलेय. मला देशभरातील अनाथालयांना भेटी देऊन तिथली परिस्थिती समजून घ्यायची इच्छा आहे. त्यामुळेच मी आज इथं आलेय,’ आणि नंतरच्या काही मिनिटांच्या संवादात ती सर्वांना बोलतं करते. 

मूळ दिल्लीची रहिवासी सोनम, गुरगावच्या ‘मिसेस इंडिया प्राइड ऑफ नेशन’ स्पर्धेची विजेती आहे. एमबीए केल्यावर तिचा दिल्लीतील सॉफ्टवेअर इंजिनिअर मनीष गुप्तांशी विवाह झाला. लग्नानंतर मुलांचे संगोपन, घर सांभाळणं यात स्वत:च्या छंदासाठी सोनम वेळ देऊ शकली नाही. दरम्यान, तिला मिसेस इंडिया या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेबद्दल कळले. तिने स्पर्धेत सहभाग नोंदवला. पात्रता फेरी पार करून अंतिम फेरी गाठली. जिद्द, मेहनत, परिश्रमाच्या बळावर तिने यशाचा मुकुट पटकावला. संसार सांभाळूनही छंद जोपासता येतात हे तिने सिद्ध केले. ‘सौंदर्य स्पर्धा’ महिलांसाठी एक उत्तम मंच आहे. या स्पर्धा केवळ सौंदर्याधारित नसतात. इथे बुद्धिमत्तेचाही कस लागतो. आजकाल रंग, वय असे निकष बदलले आहेत. स्पर्धेत भाग घेतल्याने महिलांचा आत्मविश्वास वाढतो. स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा मिळते, असे सोनमला वाटते.

समाजदेणं फेडायचं म्हणून... सौंदर्य स्पर्धेतल्या यशानंतर विविध ठिकाणी कार्यक्रमासाठी जाताना सोनमने अनेक अनुभव घेतले. बऱ्याच घटना बघितल्या. त्या बघून तिला असे वाटले की, या जगात खूप दु:खीकष्टी लोक आहेत. त्यांची स्थिती बदलण्यासाठी आपण थोडाफार हातभार लावला तर त्यांच्या काही समस्या सुटू शकतील. याच उद्देशाने ती गेेल्या काही महिन्यांपासून दिल्ली, आग्रा, पुणे, औरंगाबाद अशा शहरांतील आश्रमांना भेटी देऊन अनाथांना शैक्षणिक साहित्य, फळवाटप किंवा शिकवणीच्या माध्यमातून मदत करतेय. या कामात तिचा मुलगाही सोबत असतो. या निमित्ताने त्याच्यावरही समाजऋण फेडण्याचे संस्कार ती करते आहे. 

अनाथाश्रमांना भेटी देण्याच्या या सगळ्या प्रवासात मी खूप शिकत गेले. खूप मेहनत घेतली. अजूनही घेत आहे. या क्षेत्रात काम करताना शरीराच्या संतुलनासोबत आरोग्य राखणेही महत्त्वाचे असते. सातत्याच्या प्रवासामुळे आहाराचं वेळापत्रकं पाळणं अवघड असतं. मात्र अडचणी आल्या तशा त्यातून मार्गही काढला. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या, असं सोनम सांगते. याशिवाय सोनमला वॉल पेंटिंग, कविता, फॅशन डिझायनिंगचा छंदही आहे. सामाजिक विषयांवर तिने कविता लिहिल्या आहेत. 


लेखिकेचा संपर्क :  ८६६८७६१
१६५