आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
किरण जैन, मुंबई : 'एक दूजे के वास्ते 2' ही मालिका लवकरच टीव्हीवर प्रसारित होणार आहे. यानिमित्त आम्ही या मालिकेत श्रवणची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या मोहित कुमारसोबत खास चर्चा केली. श्रवणने सांगितले की, कलावंतांची संपूर्ण टीम ही मालिका यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतेय.
मालिकेचा पहिला सीझन हिट ठरला होता आणि सुमन व श्रवणचे पात्र घराघरात ओळखीचे झाले होते. आता मी श्रवणचे पात्र साकारत असल्याने साहजिकच ही मोठी जबाबदारी असेल. मात्र, हे विशिष्ट प्रकारचे अतिरिक्त ओझे नाही. तर, यामुळे सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरित करत आहे. माझ्यासोबतच संपूर्ण टीम आणि कलावंत ही मालिका यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहोत.
ही मालिका सैन्याच्या पार्श्वभूमीवर आधारित एक प्रेमकथा आहे. याचे चित्रिकरण भोपाळच्या छावणी भागात केले आहे. मी यात श्रवण मल्होत्राचे पात्र साकारत आहे. तो उद्योजक देवराज मल्होत्राचा मुलगा आहे. श्रवण श्रीमंत मुलगा आहे. तो फक्त आयुष्याची मजा घेण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळेच सुमन त्याला पसंत करत नाही. ती लष्करी पार्श्वभूमी असलेली अत्यंत शिस्तप्रिय आहे. पुढे चालून कथा वेगळे वळण घेते आणि श्रवण एक लष्करी अधिकारी होतो.
होय, मी खऱ्या आयुष्यातही बऱ्याच अंशी श्रवणसारखाच आहे. मला लोकांसोबत बोलायला चांगले वाटते.
आम्ही कुटुंबापासून दूर भोपाळमध्ये राहत आहोत. त्यामुळे संपूर्ण टीम एका कुटुंबाप्रमाणे झाली आहे. मी खासकरून जय ठक्करच्या जवळ आहे. तो माझ्या जिवलग मित्राचे पात्र साकारत आहे. अक्षय सर (अक्षय आनंद) मला मेंटॉरसारखे आहेत. अभिनयात ते मला खूप मदत करतात.
लदाखमध्ये शूट करणे चांगला अनुभव होता. मला येथील सुंदर डोंगरांमध्ये दुचाकी चालवण्याची संधीही मिळाली. मला बर्फाळ प्रदेशात अनेक सैनिकांसोबत चर्चा करण्याची संधी मिळाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.