Home | Gossip | Mohra Girl Poonam Jhawer looks like this now

'मोहरा'मधील ही सोज्वळ अॅक्ट्रेस रिअल लाइफमध्ये आहे बोल्ड, हा अंदाज बघून व्हाल घायाळ!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 02, 2018, 12:18 AM IST

'मोहरा'ने पूनमला रातोरात स्टार बनवले होते. यानंतर पूनमने काही हिंदी चित्रपटांत काम केले, पण तिला फारसे यश मिळाले नाही.

 • Mohra Girl Poonam Jhawer looks like this now

  मुंबई - नव्वदच्या दशकातील हिट 'मोहरा'मध्ये झळकलेल्या एका अभिनेत्रीने आपल्या सोज्वळ आणि साधेपणाने सिनेरसिकांची मनं जिंकली होती. प्रत्येकाच्या तोंडात त्या अभिनेत्रीचीच चर्चा होती, पण आज जर त्याच अभिनेत्रीला आपण पाहिले तर आपला आपल्या डोळ्यांवर मुळीच विश्वास बसणार नाही.

  खासगी आयुष्यात बोल्ड आहे ही अॅक्ट्रेस...
  आम्ही बोलतोय, ते 'मोहरा' चित्रपटात सुनील शेट्टीच्या अपोझिट झळकलेल्या पूनम झावेरविषयी. 'मोहरा' चित्रपटाने पूनमला रातोरात स्टार बनवले होते. यानंतर पूनमने काही हिंदी चित्रपटांत काम केले, पण तिला 'मोहरा'प्रमाणे यश मिळाले नाही. चित्रपटसृष्टीतील अपयशाने पूनम हिंदी चित्रपटांतून गायब झाली. नंतर तिने साऊथ चित्रपटांकडे आपला मोर्चा केला. तिथे तिचे काही चित्रपट हिटही झाले.


  अचानक आली चर्चेत...
  पूनम अचानक तेव्हा चर्चेत आली, जेव्हा तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 'मोहरा'मध्ये अगदी पारंपरिक आणि लोभस रुपात दिसलेल्या पूनमचे इतके बोल्ड फोटो पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते. आता पूनमचा चेहरा पूर्णपणे बदलला आहे. पूनमने प्लास्टीक सर्जरी केल्याचे तिच्या या फोटोजमधून दिसून येते. तिचे फोटो पाहून कोणीच ही 'ना कजरे की धार' गाण्यात दिसलेली अभिनेत्री आहे, असे म्हणणार नाही.


  2013 साली केले शेवटचे बॉलिवूडमध्ये काम..
  पूनम झावेर 2013 साली आलेल्या 'आर राजकुमार'मध्ये दिसली होती. पूनमने 2012 साली अक्षय कुमारचा चित्रपट 'ओएमजी: ओ माय गॉड' मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. पूनम अभिनेत्रीसोबतच गायिकाही आहे आणि तिने अनेक गाणीही गायली आहेत. पूनम समाजसेवेचेही काम करत आहे. ती काही महिला संघटना आणि एनजीओसोबत काम करत आहे.

Trending