आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 डिसेंबरला साजरी केली जाईल मोक्षदायिनी एकादशी, या व्रतामुळे मिळत नरकातून मुक्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीला भारतीय धर्म शास्त्रामध्ये मोक्षदा तसेच मोक्षदायिनी एकादशी मानले जाते. मोक्षदा एकादशीचे धार्मिक महत्त्व पितरांना मोक्ष देणारी एकादशी रूपातही आहे. मान्यतेनुसार हे व्रत करणाऱ्या व्यक्तीसोबतच त्याच्या पितरांसाठीही मोक्ष दरवाजे उघडले जातात. यावेळी मोक्षदायिनी एकादशी 8 डिसेंबरला साजरी केली जाईल.

  • अर्जुनाला दिला होता उपदेश

महाभारताच्या युद्धाच्यावेळी अर्जुन मोहग्रस्त झाला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश देऊन अर्जुनला त्या मोहातुन बाहेर काढले होते. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल पक्षाची एकादशी होती. तेव्हापासून या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हटले जाते. धर्मग्रंथांनुसार आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची संपूर्ण विधीसहित पुजा केल्यावर मोक्षाची प्राप्ती होते.

  • अशाप्रकारे करावे एकादशी वार्त

मोक्षदा एकादशी (8 डिसेंबर) सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून अंघोळ करून व्रत सुरू करा. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीचे किंवा फोटोचे पुजन करा. - गायीच्या तुपाचा दिवा लावा. खडिसाखरेचा नैयवेद्य दाखवा. शक्य असल्यास पूर्ण दिवस उपवास ठेवा किंवा एकदा फळे खाऊ शकतात.  - रात्री न झोपता भजन-कीर्तन करावे. या दिवशी आपल्या हातुन कळत नकळत घडलेल्या पापांचे प्रायश्चित करावे. - दुसऱ्या दिवशी परत श्रीकृष्णाची पुजा करावी तसेच ब्राह्मणांन अन्नदान करावे.  - धर्म शास्त्रांनुसार या व्रताचे फळ हजारो यज्ञांपेक्षा जास्त आहे. 

बातम्या आणखी आहेत...