आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तू मला आवडतेस..माझ्याशी का बोलत नाहीस म्हणत हात धरून केले होते असे कृत्य, नराधमाला 3 वर्षे सक्तमजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- शाळेत जात असतांना मागून येऊन विदयार्थिनीचा हात धरुन विनयभंग करणाऱ्या तरुणास तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा येथील विशेष जिल्हा कोर्टाने सुनावली.

 

स्थानिक आंबेडकर नगर मधील सचिन महादेव चिम याने 11 मार्च 2016 रोजी शहरातीलच एका विदयार्थिनीचा शाळेत जाऊन पाठलाग केला. या वेळी मागून येऊन तू मला आवडतेस तू माझ्याशी का बोलत नाहीस असे म्हणत तिचा उजवा हात पकडून ओढत विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेची तक्रार पीडीत युवतीने पोलिस स्टेशनला दाखल केली होती. त्यावरुन सचिन चिम याचेसह तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास करुन पोलिसांनी आरोपपत्र कोर्टात दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण विशेष जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त न्यायाधीश एस.एम. बेलकर यांच्या कोर्टात सादर करण्यात आले. या वेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरली. एकुण सात साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यावरुन सचिन चिम यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तर इतरांना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. या प्रकरणात सरकारी वकील तथा सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी युक्तीवाद केला होता.

बातम्या आणखी आहेत...