Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Molestation of Married at Belkheda

विवाहिता घरात एकटी असल्याची संधी साधत केला विनयभंग

प्रतिनिधी | Update - Jan 15, 2019, 12:04 PM IST

घटनेबाबत विचारणा केली असता शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली

  • Molestation of Married at Belkheda


    परतवाडा - विवाहिता एकटीच असल्याचे पाहून घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी प्रकाश नामदेव जामूनकर (वय २८) व राजू मंगल्या साकोम (वय २८) दोघेही रा. बेलखेडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित वीस वर्षीय विवाहिता रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरात एकटीच होती. दरम्यान आरोपींनी पीडितेच्या घरात प्रवेश करून आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर आरोपींनी पीडितेचे तोंड दाबून हात पकडले व छेडछाड केली. त्यानंतर पीडितेचे सासरे घरी आल्यानंतर सदर घटना विवाहितेने सासऱ्यांना सांिगतली. त्यामुळे सासऱ्यांनी दोघांनाही घटनेबाबत विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने परतवाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून प्रकाश जामूनकर व राजू साकोम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


    दरम्यान, शहरासह जिल्ह्यात महिला व युवतींंच्या विनभंगांच्या घटनांत वाढ झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांसह पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Trending