आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्याने घेतलेले पैसे परत दे नसता तुला उचलून घेऊन जाईल म्हणत विवाहितेचा विनयभंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - तुझा नवरा कुठे आहे, त्याने व्याजाने घेतलेले माझे पाच लाख रुपये परत कर म्हणत एका तीस वर्षीय विवाहितेचा घरात कोणी नसल्याचा फायदा घेत विनयभंग केल्याची घटना सावंगी हर्सुल येथे मंगळवारी सकाळी घडली आहे. या बाबत विवाहितेच्या फिर्यादीवरुन गुरुवारी फुलंब्री पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


नीलेश किशोरलाल तोतला  (रा. ज्योतीनगर, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. नीलेश तोतला यांना सावंगी येथील एका शेतकऱ्याला पाच लाख रुपये व्याजाने दिलेले आहे. त्या बदल्यात संबंधित शेतकऱ्याची जमीन लिहून घेतली आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता फिर्यादी महिला घरात एकटी होती. त्या वेळी नीलेश तोतला तिच्या घरात जाऊन म्हणाला की, तुझा नवरा कुठे आहे, त्याने माझ्याकडून व्याजाने घेतलेले पाच लाख रूपये दे नसता तुला उचलून घेऊन जाईन, असे म्हणत तिच्या अंगाला झटून विनयभंग केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने घटना स्थळावरुन पळ काढला.