Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Molestation of minor girl accused get three years of imprisonment

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस तीन वर्षांची शिक्षा 

प्रतिनिधी | Update - Jan 12, 2019, 12:10 PM IST

खटल्यादरम्यान न्यायालयात एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले होते.

  • Molestation of minor girl accused get three years of imprisonment

    सोलापूर- घराशेजारी सुरू असलेले रंग काम पाहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांनी आरोपीस तीन वर्षांची शिक्षा तसेच सात हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आली. या दंडाच्या रकमेतून पाच हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. विनयभंगाचा हा प्रकार ७ फेब्रुवारी २०१३ रोजी घडला. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    खटल्यादरम्यान न्यायालयात एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. तसेच परिस्थितीजन्य पुरावा हा आरोपीने गुन्हा केल्याचे सिध्द करतो, असा युक्तिवाद सरकारी वकिल शीतल डोके यांनी केला. तो स्वीकारण्यात आला. याप्रकरणी सरकार पक्षाकडून अॅड. शीतल डोके, मूळ फिर्यादीकडून अॅड. विद्यावंत पांढरे, आरोपीकडून अॅड. एच. एच. बडेखान यांनी काम पाहिले.

Trending