आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासागर (एमपी) - एका पाळीव श्वानाने आपल्या मालकाच्या मुलीची अब्रू वाचवली. सागर जिल्ह्यातील बड़ा करीला परिसरातील रहिवासी 14 वर्षीय मुलगी आपल्या घराबाहेर काही कामानिमित गेली होती. तेवढ्यात बाहेर बसलेल्या दोन आरोपींनी तिच्यावर झडप घातली. ते तिला घेऊन सुनसान जागेवर गेले. तेव्हा तेथे या मुलीच्या घराचा पाळीव श्वान “मोती” आला. त्याने पाहिले की, एका आरोपीने मुलगी ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबलेले आहे. तर दुसरा आरोपी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करत आहे. श्वानाने तोंड दाबणाऱ्या आरोपीच्या पायाला करकचून चावा घेतला. चावा घेताच आरोपीची मुलीच्या तोंडावरील पकड सैल झाली आणि तिने ओरडणे सुरू केले. आवाज ऐकून नातेवाईक पोहोचले आणि आरोपी पळून गेले.
डास घालवण्यासाठी भूस्सा आणायला गेली होती मुलगी
- मोतीनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी विपिन ताम्रकार म्हणाले- ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजता घडली आहे.
- पीडित मुलगी म्हणाली की, रात्री मच्छर खूप चावत होते. तेव्हा आजी म्हणाली की, बाहेरून भुस्सा आणून तो जाळ. बाहेर गेले तर तेथे शेजारी राजणारे ऐशु (39) आणि पुनीत (22) बसलेले होते. ऐशु दारूच्या नशेत होता. त्याने पाठीमागून मला धरले.
- पुनीतने माझे तोंड दाबले आणि ते मला घरापासून काही अंतरावर असलेल्या एका पडक्या घरात घेऊन गेले. पुनीत माझे तोंड दाबून धरले होते, तर ऐशु माझ्यासोबत घाण काम करणार होता तेवढ्यात अचानक मोती तेथे आला. त्याने पुनीतला चावा घेतला. मला ओरडण्याची संधी मिळताच मी मोठमोठ्याने किंचाळणे सुरू केले. मोतीला आणखी 2 मिनिटे उशीर झाला असता तर नराधमांनी माझे लचके तोडले असते.
आरोपी ऐशु दारू तस्करीच्या प्रकरणातून जामिनावर बाहेर
- टीआय ताम्रकार म्हणाले, ऐशु रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मागच्या महिन्यात अवैध दारू विक्रीच्या आरोपावरून त्याला अटक झाली होती. सध्या तो हायकोर्टातून जामिनावर बाहेर होता. तेव्हा त्याने पुनीतसोबत मिळून हे कृत्य केले.
- टीआई म्हणाले, दोन्ही आरोपींची एवढी दहशत आहे की, पीडितेचे कुटुंबीय या घटनेच्या 24 तासांनंतर शनिवारी रात्री तक्रार दाखल करायला आले. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.