आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात घुसून महिलेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता- घराचा दरवाजा वाजवून महिलेचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राहाता पोलिसांनी विवाहितेच्या फिर्यादीवरून गोरक्षनाथ सारंगधर वाघे (रा. केलवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (२६ सप्टंेबर) मध्यरात्रीनंतर केलवड गावात घडली. 


केलवड येथील विवाहिता व तिचे दोन मुले असे तिघे राहतात. या महिलेचा पती गेल्या तीन ते चार वर्षांपासून डोक्यावर परिणाम झाल्याने निघून गेलेला आहे. आरोपी वाघे (रा. केलवड) याने बुधवारी रात्री या महिलेच्या घराच्या दरवाजावर थाप मारली. आवाज एेकून तिने दार उघडले असता आरोपी वाघे याने या महिलेचा विनयभंग केला. आरोपीने धरलेला हात सोडण्यासाठी या महिलेने आरडाओरड केली असता या महिलेचा मुलगा व मुलगी जागे झाले. त्यांनी आरडाओरड करत शेजारी राहणाऱ्या आत्याला बोलावून आणले. त्यावेळी आरोपीने महिलेसह तिच्या नंदेस शिवीगाळ करून तुमचे काम करतो, अशी धमकी दिली. 

बातम्या आणखी आहेत...