आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्गातील मुले म्हणायचे तुझ्या पायाचा घाण वास येत आहे, त्यानंतर तिने केले असे काही की, जावे लागले हॉस्पिटलमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ- ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या महिलेला तिच्या मुलीच्या आत्महत्येच्या प्लॅनची माहिती मिळाली, त्यानंतर तिने फेसबूकवर इतर पॅरेंट्सला आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची रिक्वेस्ट केली. त्या मुलीला वर्गातील मुले रोज छेडायचे आणि चिडवायचे त्यामुळे ती खूप तणावात होती. मुलांनी तिचा एक व्हिडिओही बनवला होता, मुले तिला म्हणायचे की, तुझ्या पायातून घाण वास येत आहे. अनेकवेळा तक्रार केल्यावरही स्कूल मॅनेजमेंटने कारवाई केली नाही त्यामुळे मुलीने आत्महत्या करण्याचा प्लॅन बनवला.

 

महिलेने फेसबूकवर सांगितला सगळा प्रकार

- ही गोष्ट पर्थमध्ये राहणाऱ्या लेघ डेवी आणि तिची 12 वर्षाची मुलगी इवाची आहे. तिने वर्गातील मुले चिडवायचे म्हणून आत्महत्या करण्याचा प्लॅन बनवला होता, पण वेळेतच तिच्या पॅरेंट्सला याची माहिती मिळाली आणि त्यांनी तिला रुग्णलयात नेले.

- मुलीसोबत घडत असलेल्या घटनांविषयी महिलेने सोशल मिडियावर एक पोस्ट लिहिली, त्यात तिने सांगितले की, तिच्या मुलीला वर्गात रोज त्रास दिला जायचा. हा त्रास इतका वाढला होता की त्या मुलीने आत्महत्या करण्याचा विचार केला होता. 

- महिलेने लिहीले की, 'सोशल मिडियाच्या काळात मुलांना वाटते की, एखाद्याला नकारात्मक मेसेज पाठवणे सामान्य आहे. माझ्या मुलीला त्रास देणाऱ्या मुलांच्या पॅरेंट्सकडे तक्रार केली होती म्हणून त्या मुलांनी मलादेखील कॉल करून अपमानजनक कमेंट केली होती.

 

पायाखालून घाणा वास येत आहे याचा व्हिडिओ पाठवला

-  मुलगी वर्गात तिचे पाय पसरून बसली होती तेव्हा त्या मुलांनी तिचा व्हिडीओ काढला आणि तिला पाठवला, त्यासोबत असे कॅप्शन लिहिले की, तुझ्या पायातून घाण वास येत आहे. 
 - त्यानंतर तिने पोलिसांना या घटनेची माहिती. पण ते सगळे लहन मुले होती म्हणून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केला नाही.

- हा व्हिडिओ दाखवून अनेक दिवस मुलीला त्रास दिला जायचा. त्यामुळे ती खूप तणावाखाली आली होती, आणि त्यामुळेच तिने आत्महत्या प्लॅन केला होता.

- या घटनेनंतर महिलेने फेसबूकच्या माध्यमातून इतर मुलांच्या पॅरेंट्सला आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची रिक्वेस्ट केली.

 

बातम्या आणखी आहेत...