आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसकॅरेजनंतर झाला मुलाचा जन्म, मुलाने आईला म्हटले-मी तोच मुलगा आहे तो परत आलोय.. महिलेला विश्वासच बसेना 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबरा - ऑस्ट्रेलियामध्ये एका पॅरेंटिंग ब्लॉगरबरोबर काही दिवसांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यावर तिला विश्वासच बसत नव्हता. तिने सांगितले की, तिच्या चार वर्षाच्या मुलाने त्याच्या जन्मापूर्वीचे असे रहस्य सांगितले आहे ज्यावर तिला विश्वासच बसत नाहीये. लॉरा माजा नावाच्या महिलेने सांगितले की, तिचा मुलगा लुकाच्या जन्मापूर्वी तिचा एकदा गर्भपात झाला होता. त्याबाबत मुलाला माहिती नव्हते. तरीही लुकाने आईला असे काही सांगितले ज्यानंतर तिला हे शेअर करण्यावाचून राहवले नाही. 

 

मिसकॅरेजनंतर झाला लुकाचा जन्म 
लॉराने सांगितले की, तिच्या चार वर्षाच्या मुलाने म्हणजे लुकाने असा दावा केला आहे की तो गर्भपातात मृत्यू झालेला तिचाच मुलगा असून तो परत तिच्याच पोटी जन्मला आहे. हा दावा महिलेने तिच्या दोन लाख फॉलोअर्सशी शेअर केला तेव्हा त्यांची विचित्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली. 


महिलेने सांगितले की, लुकाच्या जन्माच्यापूर्वी तिचा एकदा गर्भपात झाला होता. त्यावेळी तिला हेवी ब्लिडींग झाले. प्रेग्नंसी पॉझिटिव्ह आल्याच्या काही दिवसांनीच तिच्या पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या. त्यादरम्यान तिला हेवी पिरीयड्सदेखिल सुरू झाले. या मिसकॅरेजनंतर ती पुन्हा प्रेग्नंट झाली. 

 

मुलाने सांगितले गूढ.. 
- लॉराने सांगितले की, तिला नेहमीच असे वाटत होते की, तिने मिसकॅरेजमध्ये गमावलेल्या बाळाचा आत्मा तिच्या आसपासच आहे. पण तिच्याकडे त्यासाठी काहीही पुरावा नव्हता. एक दिवस ती मुलगा लुकाला अंघोळ घालत होती. तेव्हा लुकाने आईला विचारले की, आपण ऑस्ट्रेलियामध्ये राहतो का? त्यावर लॉराने हो असे उत्तर दिले. त्यावर मुलगा म्हणाला नाही, मी तुझ्या पोटात राहत होतो. तेव्हा आई त्याला म्हणाली हो तू आधी पोटात राहत होता पण आता ऑस्ट्रेलियात राहतो. पण लुका आईच्या उत्तराने समाधानी नव्हता. लुका आईला म्हणाला, नाही मी तुझ्या पोटात आलो होतो आणि नंतर माझा मृत्यू झाला होता. मी तुला सगळीकडे शोधले पण तू माझा आवाजच ऐकू शकत नव्हती. मग मी उदास होऊन बसलो. मग एक परी आली आणि तिने मला पुन्हा तुझ्याकडे पाठवले. त्यामुळे मी तुझ्यासमोर आहे. 


मुलाचे शब्द ऐकूण आईला बसला धक्का 
लॉराने सांगितले की, तिला लुकाचे बोलणे समजले नाही. ती फक्त त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तिने सांगितले ती, तिचे मुलाशी कधीही मिसकॅरेज किंवा परीसारथ्या विषयांवर बोलणे झालेले नव्हते. तरीही मुलाने असे बोलणे तिच्यासाठी काहीचे विचित्र आणि धक्कादायक होते.

 

बातम्या आणखी आहेत...