आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 मुलांची आई मुलीची इच्छा बाळगून पुन्हा झाली प्रेग्नेंट, रिपोर्टपाहून डॉक्टर्सही चकीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका. एका स्त्रीसाठी आई बनणे हा आयुष्यातला खुप सुंदर अनुभव असतो. परंतू अमेरिकेच्या स्टेट इंडियानामध्ये राहणारी सारह इमबियरोविक्ज खुप अडचणींनंतर आई बनली होती. जेव्हा ती दिस-यांदा प्रेग्नेंट झाली तेव्हा तिचे अल्ट्रासाउंड रिपोर्टपाहून सर्वच हैराण झाले. 


रिपोर्टमध्ये काय होते 
सारह इमबियरोविक्जने सांगितले की, ती लग्नाच्या 3 वर्षांपर्यंत प्रेग्नेंट राहण्याचा प्रयत्न करत होती, परंतू काहीच झाले नाही. नंतर तिने विट्रो फर्टिलायजेशनची(आयव्हीएफ) मदत घेतली. 

 

काय आहे विट्रो फर्टिलायजेशन 
ज्या कपलला बाळ होत नाही, त्यांच्यासाठी विट्रो फर्टिलायजेशन मेथडचा वापर केला जातो. यामध्ये महिलांच्या शरीरातून स्त्रीबिज काढून स्पर्मला शरीराच्या बाहेर फर्टिलाइज केले जाते. फर्टिलायजेशन पुर्ण झाल्यानंतर अंड पुन्हा गर्भात स्थापित केले जाते.

 

लागली मुलांची लाइन 
सराहने या पध्दतीने पहिल्यांदा एका मुलाला जन्म दिला होता. पुढच्यावेळी तिने एकाच वेळी 3 मुलांना जन्म दिला. परंतू सराह आणि तिचा पती बिलला मुलगी हवी होती. तिस-यावेळी तिने या आयव्हीएफच्या आधारे प्रेग्नेंट राहण्यासाठी प्रयत्न केले परंतू तेव्हा अनेक अडचणी आल्या. डॉक्टरांनी खुप प्रयत्न केल्यानंतर ती दिस-यांदा प्रेग्नेंट झाली. तेव्हा तिचे अल्ट्रासाउंड करण्यात आले. तेव्हा समोर आले की, तिच्या गर्भात 3 मुली आहेत. मुलींना पाहून कपल खुप आनंदी झाले. आता या कपलला 7 आपत्य आहेत. 3 मुली आणि 4 मुलं आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...