आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्कमध्ये चिमुरड्यासोबत बसली होती आई, तेवढ्यात दिसली सोनेरी केसांच्या गुच्छासारखी वस्तू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जॉर्जिया - जॉर्जियामधील रहिवासी लेस्ली होवी आपल्या मुलांसोबत पार्कमध्ये बसली होती तेवढ्यात तिची नजर एका विचित्र वस्तूवर गेली. लेस्ली यांची दोन मुले पार्कमध्ये खेळत होती. तर तिचे नवजात बाळ तिच्या हातात होते. लेस्लीची नजर केसांचा गुच्छ असणाऱ्या एका वस्तूकडे गेली. तिने अशी वस्तू आयुष्यात कधी पाहिली नव्हती. यामुळे ती त्याला जवळून पाहण्यासाठी पुढे सरकली. लेस्ली जशी पुढे गेली, केसांचा गुच्छही तिच्याकडे सरकला. त्याला पाहताच लेस्ली बाळाला घेऊन वेगाने तिथून पळून गेली. लेस्लीला लगेच त्याचे सत्य लक्षात आले.

 

- लेस्लीने सोशल मीडियावर लोकांना सचेत करत आपली कहाणी शेअर केली आहे. लेस्लीने सांगितले की, ती केसांच्या गुच्छासारखी दिसणारी वस्तू तिला आकर्षित करत होती. यामुळे ती त्याला पाहण्यासाठी पुढे सरकली. लेस्लीने सांगितले, ''मी खूप नशीबवान आहे की, लवकरच मी त्या वस्तूचे सत्य ओळखले आणि तेथून मुलांना घेऊन सुरक्षित निघून आले. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.''

 

काय होती ती वस्तू?
- लेस्लीने सांगितले की, ती वस्तू Megalopyge opercularis larva म्हणजेच जगातील सर्वात खतरनाक अळ्यांपैकी एक अळी होती. ती अत्यंत विषारी अळी असते. ज्यामुळे शरीरात पस भरतो. लेस्लीने जेव्हा त्या वस्तूचे फोटो घेऊन इंटरनेटवर सर्च केला, तेव्हा तिला धक्काच बसला. तेव्हा कळले की, ही अळी रुईच्या गुच्छासारखी किंवा मांजरीच्या केसांसारखी दिसते. जो कोणी तिच्या संपर्कात येतो, त्याच्या शरीरात ती आपले खतरनाक विष सोडते. 

 

होऊ शकतो मृत्यू

- युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाच्या डॉक्टर नॅन्सी हिंकल म्हणाल्या, ''नेहमीच लोक या अळीला रुई समजून स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात आणि तिची शिकार होतात. परंतु तिला चुकूनही स्पर्श न करण्याचा सल्ला दिला जातो.'' डॉ. नॅन्सी सांगतात की, तिचे विष शरीरात भयंकर वेदना होतात. या वेदना एखाद्या जेलिफिशने दंश केल्याप्रमाणे असतात. यानंतर रक्तात मिसळून हे विष त्वचाही जाळू शकते. वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर मृत्यूही होऊ शकतो.

 

अशा गोष्टींना स्पर्श करू नका...
- लेस्लीने सोशल मीडियावर लोकांना जागरूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी लिहिले, ''प्रत्येक सुंदर वस्तू चांगलीच असते असे नाही. पार्क किंवा बाहेर कुठेही अशी गोष्ट दिसल्यास ताबडतोब तिथून निघून जा. तिला हात लावण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका.''

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...