Home | Khabrein Jara Hat Ke | Mom shocked after seeing blood on her 2 year old daughters nappy

2 वर्षांच्या मुलीला अचानक होऊ लागले ब्लिडिंग, आईने डायपर पाहिले तर तिला बसला जबर धक्का, इतरांना देतेय इशारा 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 15, 2019, 12:00 AM IST

तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून डायपर विकणाऱ्या कंपनीला चांगलेच सुनावले. 

 • Mom shocked after seeing blood on her 2 year old daughters nappy

  डनफर्मलाइन - स्कॉटलँडच्या डनफर्मलाइनमध्ये राहणारी एक महिला चार्लोट डाऊनी तिच्या 2 वर्षाच्या मुलीला ब्लिडिंग होत असल्याचे पाहून अक्षरशः आश्चर्यचिकत झाली. मुलीचे रक्त वाहताना पाहून आई प्रचंड घाबरून गेली. तिने अगदी घाईघाईत मुलीला पाहिले तर तिची नजर मुलीच्या डायपरवर पडली. त्यावर असेकाही होते की तिला जबर धक्का बसला.


  चार्लोटने सांगितले की, तिच्या मुलीच्या डायपरमध्ये एक काचेचा तुकडा फसलेला होता. हा तुकडा कापसाच्या मध्यभागी फसलेला होता. या तुकड्यामुळे जखमी होऊन मुलीच्या पायातून रक्त वाहायला लागले होते. हे पाहून महिलेला प्रचंड धक्का बसला. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून डायपर विकणाऱ्या कंपनीला चांगलेच सुनावले.


  पुढे वाचा, इतर पालकांना देतेय इशारा..

 • Mom shocked after seeing blood on her 2 year old daughters nappy

  27 वर्षांच्या चार्लोटने मुलीबरोबर घडलेल्या या घटनेनंतर इतर पॅरेंट्सना इशारा दिला आहे. चार्लोट म्हणाली, नॅपी विकणाऱ्या आस्डा कंपनीने या प्रकरणाची गांभीर्याने माहिती घ्यावी. एका मुलीच्या नॅपीमधून काचेचा तुकडा निघणे ही काही साधीसुधी बाब नाही. मी इतर पॅरेंट्सना विनंती करेल की, त्यांनीही त्यांच्या मुलांना नॅपी घालण्याआधी ते तपासून घ्यावे. 


   

 • Mom shocked after seeing blood on her 2 year old daughters nappy

  रात्री अचानक रडत आली 
  चार्लोट म्हणाली की, मी मुलीला ते नॅपी घातले होते. त्यानंतर अर्ध्या तासाने ती रडत माझ्याकडे आली. त्यावेळी तिला ब्लिडींग होत होती. मी डॉक्टरांनाही दाखवले. आता माझी मुलगी नॅपीलाही घाबरते. 

Trending