आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mom Suddenly Gets Inside Room Of His 14 Year Old Son, After That Mom Call To Police

14 वर्षांच्या मुलाच्या खोलीमध्ये अचानक पोहोचली आई, आतील परिस्थिती पाहून बोलावले पोलिस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका. मेरीलँडमध्ये राहणारी एक आई अचानक आपल्या 14 वर्षांच्या मुलाच्या खोलीत पोहोचली. तेव्हा ती हैराण झाली आणि तिने तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तिच्या मुलाला अटक करुन तुरुंगात पाठवले. जे पालक आपल्या मुलांवर लक्ष ठेवत नाही, त्यांना सावध करणारी ही बातमी आहे. 

 

रुममध्ये नेमके काय झाले?
- मीडिया रिपोर्ट्सनुसार 14 वर्षांच्या सोलोमन प्यूलची आई आपल्या दोन वर्षांच्या मुलाला झोपी घालत होती. यावेळी तिचा मोठा मुलगा सोलोमन आणि त्याची 8 वर्षांची कजिन वरच्या खोलीत खेळत होते. 
- अचानक या दोघांचाही आवाज येणे बंद झाला. यानंतर सोलोमन ही हळूच त्यांच्या रुममध्ये पोहोचली. पण आतील परिस्थिती पाहून ती हैराण झाली. 

 

कजिनवर बलात्कार करत होता सोलोमन 
- सोलोमनच्या आईने पाहिले की, तिचा मुलगा निर्वस्त्र होता आणि 8 वर्षांच्या बहिणीसोबत गैरकृत्य करत होता. त्याच्याजवळ एक चाकू होता. आईने रागारागात पोलिसांना फोन केला. 
- सोलोमनच्या आईने पोलिसांना आपल्या मुलाच्या वागणुकीविषयी सांगितले. यानंतर पोलिसांनी 8 वर्षांच्या पीडित मुलीचा जबाब नोंदवला. मुलीने सांगितले की, सोलोमन तिला चाकूचा धाक दाखवत म्हणाला की, जर तु माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर मी तुला चाकू मारेल. धमकी दिल्यानंतर सोलोमन तिच्यासोबत गैरकृत्य करत होता.

 

पोलिसांनी तुरुंगात पाठवले 
- पीडित मुलगी आणि सोलोमनच्या आईच्या जबाबानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिसांनी तपास केल्यावर सोलोमनने मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले. यानंतर त्याच्यावर वयस्क लोकांप्रमाणे खटला चालवण्यात आला. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मेरीलँडच्या कायद्यानुसार जर एखादी व्यक्ती अशा प्रकारच्या अपराधांमध्ये सापडली तर, 16 वर्षांच्या मुलावरही एखाद्या वयस्कर व्यक्तीप्रमाणे खटला चावला जाऊ शकतो. पण सोलोमन फक्त 14 वर्षांचा होता, तरीही त्याच्यावर हा खटला चालवण्यात आला. कारण त्याचा अपराध हा गंभीर होता, यामुळे हा जन्मठेपेचा निर्णय घेण्यात आला.


सोलोमन केस वादाचा विषय बनला 
- काही समाजसेवकांमध्ये या घटनेमुळे वाद झाला. काही लोक सोलोमनला दोषी ठरवत होते तर काही लोक त्याची बाजू घेत होते. काही लोक म्हणाले की, तो पोर्न मूव्हीज पाहत असेल आणि ते पाहून त्याने हे कृत्य करणे शिकले असेल. अशावेळी त्याला बालसुधारगृहात पाठवायला हवे होते.

 

बातम्या आणखी आहेत...