आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mom Vomits For Days After Learning What Was Inside The Coconut Tetra Pack, Now Making Aware Peoples

पाकीटबंद नारळपाणी पीत होती महिला, टेट्रा पॅकमध्ये डोकावून पाहताच सुरू झाल्या उलट्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही कहाणी 'शॉकिंग डिस्कव्हरी' सिरीजअंतर्गत आहे. जगभरात कळत-नकळत असे अनेक शोध लागले आहेत, ज्याबाबत नेहमी लोकांना माहिती नसते.)


न्यूयॉर्क - न्यूयॉर्कच्या गोशनमधील रहिवासी एक महिला पाकीटबंद नारळपाणी प्यायल्याने आजारी पडते. तिला भयकंप सुटतो. ते टेट्रा पॅक ती उघडून पाहते, तेव्हा आतील वस्तू पाहून तिला सारख्या उलट्या व्हायला सुरुवात होते. ती वस्तू आठवून अनेक दिवस ती उलट्या करत राहते. आता ही महिला आपल्यासोबत घडलेली ही घटना सांगून इतरांना जागरूक करत आहे.

- अमेरिकेच्या न्यूयॉर्कची रहिवासी बार्बरा किनलेने सोशल मीडियावर आपली ही कहाणी शेअर केली आहे. बार्बराने सांगितले की, उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी तिने नारळपाण्याचे पाकीट खरेदी केले, परंतु ते पाणी पिताच ती आजारी पडली आणि तिला उलट्या सुरू झाल्या. यानंतर तिने त्या पाकिटात पाहिले, तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली.

 

काय होते त्या पाकिटात?
नारळपाण्याच्या त्या पाकिटात एक विचित्र वस्तू होती. यानंतर महिलेने ही सर्व घटना सोशल मीडियावर शेअर करत विचारले की, हे काय आहे? कारण तिला हे कळले नव्हते की, ती घाणेरडी वस्तू नेमकी काय होती? परंतु एवढे निश्चित होते की, ते एखाद्या सागरी प्राण्यासारखे काहीतरी होते.
बार्बराच्या फेसबुक पोस्टवर काही जणांनी सांगितले की, तो एक प्रकारचा मासा आहे, तर काही म्हणाले की, तो ऑक्टोपस होता?

 

हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाली बार्बरा
- यानंतर बार्बराला अनेक दिवस उलट्या झाल्या. यानंतर तिला डायरिया झाला. तब्येत जास्त बिघडल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. ठीक झाल्यानंतर बार्बराने सोशल मीडियावर ही कहाणी सांगितली. या पोस्टला 50 हजार जणांनी शेअर केले.

 

कुठून आली ही वस्तू?
आता प्रश्न उठतोय की, ती जी काही वस्तू होती, ती त्या नारळपाण्याच्या पाकिटात कशी काय आली? आपण दररोज वापरणारे पाकीटबंद पदार्थ कितपत सुरक्षित आहेत?

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos.. 

 

बातम्या आणखी आहेत...