आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोना सिंगच्या लग्नविधींना सुरुवात, हातावर रचली मेंदी... उद्या चढणार बोहल्यावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः 'जस्सी जैसी कोई नही' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मोना सिंग बोहल्यावर चढण्यास सज्ज झाली आहे. नुकतीच तिच्या हातावर लग्नाची मेंदी रचली. तिचा जवळचा मित्र आणि विनोदवीर गौरव गेराने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मोनाच्या मेंदी सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत. या सेरेमनीला मोनाचे जवळचे मित्र उपस्थित होते. 27 डिसेंबर रोजी दक्षिण भारतीय बँकर श्यामसोबत मोना विवाहबद्ध होणार आहे. 


बॉम्बे टाईम्सच्या वृत्तानुसार, लग्नापूर्वी मोनाने गोव्यात बॅचलरेट ट्रिप एन्जॉय केली. मोनाच्या लग्नाविषयी बोलताना एका सूत्राने माहिती दिली की, लग्नाच्या दिवशी तिला कोणत्याही प्रकारचे अटेंशन नको आहे. म्हणूनच, केवळ अतिशय खास लोक विवाहात सामील होतील. लग्नाआधी मोनाने 'कहने को हमसफर है' या वेबसीरिजच्या सीझन 3 चे शूटिंग पूर्ण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...